Home गडचिरोली पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या सामाजिक संस्था, संघटना.

पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या सामाजिक संस्था, संघटना.

44
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220719-WA0005.jpg

  • पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या सामाजिक संस्था, संघटना.

    गडचिरोली:// मागील 8 दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असल्याने सोबतच गोसेखुर्द व मेडिगट्टा प्रकल्पाचे दरवाजे खुले केल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती तयार झाली. अनेक गावे पाण्यात बुडाली व मोठ्या प्रमाणात गाव खेड्यात पाणी शिरून घरांचे व लोकांचे आर्थिक नुकसान झाले. ह्याच गोष्ठीची दखल घेत सामाजिक जाण म्हणून राज्यातील काही सामजिक संस्था व संघटनाच्या माध्यमातून #HelpGadchiroli अभियान राबवून शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन गडचिरोली, लेजेंड्स क्लब पुणे
    द स्ट्रेंथ ऑफ युनिटी नागपुर यांच्या पुढाकाराने स्वराज्य फौंडेशन आलापल्ली, टायगर ग्रुप आलापल्ली व इतर सामजिक संस्था व संघटनेच्या सहकार्याने विशेष मोहीम राबवून पूरग्रस्तांच्या मदती करिता ऑनलाईन पद्धतीने लोकवर्गणी मराठी रिट्विट, Gadchiroli_ig व मी गडचिरोलीकर या सोशल मिडिया अकाऊंट च्या सहयोगाने जमा करन्यात आली. जमा झालेल्या मदत राशीतून अहेरी उपविभागतील गोल्लाकर्जी, निमलगुडम, गुड्डीगुडम, या चार अति पूरग्रस्त भागात जीवणावश्यक वस्तूनी तयार 75 हुन अधिक किट चे वाटप स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले. त्यामध्ये भाजीपाल्या पासून किराणा सामान पर्यंतच्या बऱ्याच वस्तूंचा समावेश होता.
    ह्या अभियानात विशेष पुढाकार शिवकल्याण संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे, मी गडचिरोली ट्विटर चे संचालक मयुर गावतुरे, स्वराज्य फौंडेशन चे अध्यक्ष कुणाल वर्धलवार आणि त्यांची टीम ने घेऊन गरजूंना कठीण समयी मदत केले. परिणामी त्या गावातील नागरीकांनी अश्या वाईट वेळेत तुम्ही येऊन भेट घेतली हेच आमच्यासाठी आनंदाची गोष्ठ आहे असे बोलून समाधान व्यक्त केले.

Previous articleजिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा
Next articleधान रोवण्याची कामे रोजगार हमी योजनेतून करा : शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here