Home नांदेड नांदेड (नवा मोंढा) येथील मराठा मुलींचे वसतीगृह प्रवेशासाठी तयार!

नांदेड (नवा मोंढा) येथील मराठा मुलींचे वसतीगृह प्रवेशासाठी तयार!

217
0

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0031.jpg

नांदेड (नवा मोंढा) येथील मराठा मुलींचे वसतीगृह प्रवेशासाठी तयार!
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड:

मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगनायक ॲड. पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रासह देशभरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणुन मराठा समाजातील गरीब व होतकरू मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने मराठा सेवा संघ नांदेडच्या पुढा‌काराने व समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने नवा मोंढा नांदेड येथील वसतीगृहाचे सुरू केलेले पाच मजली बांधकाम आता पूर्ण झाले असून प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील हुशार, गरीब व होतकरू मुलींना दहावीनंतर पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे नांदेड सारख्या ठिकाणी राहून पुढील शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेता येत नव्हते समाजातील विविध स्तरांतील दानशूर व समाजाप्रती सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीनी सदर वसतीगृह बांधकामासाठी पन्नास रुपयापासून ते पाच लक्ष रूपये पर्यंत सढळ हाताने मदत केली आहे.वास्तूचे बांधकाम अतिशय देखणे व दर्जेदार झाले आहे.वसतीगृह बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत उच्च दर्जाचे वापरण्यात आले आहे.त्यामुळे वसतीगृहात राहणाऱ्या मुलींना अत्यंत दर्जेदार वास्तूमध्ये राहत असल्याचा अनुभव येणार आहे.वसतीगृहाची क्षमता शंभर मुलींची असून दहावीनंतर आय. टी. आय./पाॅलीटेक्नीक/डी. फार्मसी./ बारावी बी.फार्मसी/बी.एस.सी./,बी.एस.सी.नर्सिंग,/इंजिनिअरिंग/एम बी बी एस/बी. काॅम./बी.ए.,/एम.ए.,/एम.काम.,/एम. एस.सी.,/एम.फार्मसी,/बी. एड.,/एम. एड.,/पी. एच.डी.,/ चे शिक्षण नांदेड शहरात घेणाऱ्या मुलींना वसतीगृहामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तरी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी समाजातील गरजू मुलींनी
https://forms.gle/4zakX1Rr7L8tLpXQ8 या गुगल लिंकवर जावून मोबाईल वरून किंवा नेटकॅफेवरून आॅनलाईन फाॅर्म पूर्णपणे भरावा प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर होणार असून प्रवेश निश्चित झाल्यानंतर नाममात्र फिस आकारली जाणार आहे.
या वसतिगृहाचा लाभ जास्तीत जास्त मुलींनी घेण्याचे आवाहन प्रवेश प्रक्रिया समिती व मराठा सेवा संघ नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleधोखा..! सावधान बिर्याणी खाताहेत !!
Next articleआता नरसी चौक सीसीटिव्ही कॅमेरेच्या नजरेत.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here