Home नांदेड आता नरसी चौक सीसीटिव्ही कॅमेरेच्या नजरेत.

आता नरसी चौक सीसीटिव्ही कॅमेरेच्या नजरेत.

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0039.jpg

आता नरसी चौक सीसीटिव्ही कॅमेरेच्या नजरेत.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नरसी -आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्याच्या सीमेवरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नरसी चौकात, नरसी ग्राम पंचायतने व रामतिर्थ पोलीसांनी संयुक्त विद्यमाने मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून पहिल्यांदा हे चौक सिसिटिव्हीच्या नजरेत असणार आहे. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत दोघांनी संयुक्तपणे राबविलेल्या या महत्त्वकांक्षी उपक्रमांमुळे व्यापा-यांसह नागरिकांतून कौतुक होत आहे.
नायगाव तालुक्यात सर्वांत मोठी ग्राम पंचायत समजल्या जाणा-या नरसी ग्राम पंचायतचे सरपंच गजानन पाटील भिलवंडे व रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि विजय जाधव यांनी पुढाकार घेतला दरम्यान नरसी येथील मुख्य चौकात सिसी टिव्ही कॅमेरा बसवणे गरजेचे होते पण आजपर्यंत कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते पण रामतिर्थ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी विजय जाधव व युवा सरपंच गजानन शिवाजीराव पाटील भिलवंडे यांनी पुढाकार घेऊन हा महत्त्वाचा प्रश्न हाताळत भर चौकात चारही मार्गावर नजर ठेवण्यासाठी सिसिटिव्ही कॅमेरा बसवल्याने पोलीस ठाण्यात बसून सर्व घडामोडी दिसणार आहेत.

लोकसभागातून उभारलेले सीसी टिव्ही कॅमेरातून पोलीस चौकीच्या चारही बाजूचे रोड जवळपास अडीशे मीटर हे थेट दिसणार असल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधीक्षक आर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सपोनी विजय जाधव यांनी तिस हजार रुपये दिले आहेत तर शिवसेनेचे तालुका प्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली नरसी ग्रामपंचायत कार्यलयाने सत्तर हजार रुपयांचे आर्थिक वाटा उचला असल्याने रामतिर्थ पोलीसांचे व नरसी ग्राम पंचायतचे व्यापा-यांसह सर्व सामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Previous articleनांदेड (नवा मोंढा) येथील मराठा मुलींचे वसतीगृह प्रवेशासाठी तयार!
Next articleमाननीय.सुधीर भाऊ सारखा नेता लाभला हे आमचे भाग्य. आजाद नगर वासी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here