Home पुणे पोलिस अधिकार्‍यांना हाताशी धरून आमदार लक्ष्मण जगताप बंधूंकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल...

पोलिस अधिकार्‍यांना हाताशी धरून आमदार लक्ष्मण जगताप बंधूंकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल अरुण पवार यांचा पत्रकार परिषदेत घणाघात

217
0

राजेंद्र पाटील राऊत

पोलिस अधिकार्‍यांना हाताशी धरून आमदार लक्ष्मण जगताप बंधूंकडून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल

अरुण पवार यांचा पत्रकार परिषदेत घणाघात

पिंपरी, प्रतिनिधी :उमेश पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क
माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप, विजय पांडुरंग जगताप, अमोल साहेबराव उंद्रे, तुषार दत्तात्रय झेंडे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाचा गैरवापर करीत सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकार्‍यांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप उपस्थित होते.
अरुण पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की आपण गेली 25 वर्ष मराठवाडा जनविकास संघ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारकरी पालखी सोहळ्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून वारकर्‍यांची सेवा करण्याचा उपक्रम राबवत आहे. याशिवाय गेली 10 वर्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवीत असून, प्रत्येक वर्षी पाच हजार वृक्ष लावून ते वृक्ष जगविण्यासाठी काम करीत आहोत, असे अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असताना आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ माजी नगरसेवक शंकर जगताप व त्यांच्या नातेवाईकांनी आपण विकसनास घेतलेली जमीन नावावर करण्यासाठी बोगस स्वाक्षरी, मोजणी, त्याचबरोबर पोलिसांना हाताशी धरून माझे व माझ्या कुटुंबाचे चारित्र्य हनन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. या लोकांपासून मला व माझ्या कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे आपण याबाबत राज्य मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून, मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्याचबरोबर माझी आर्थिक फसवणूक झाली असल्यामुळे राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडेही लेखी तक्रार केली असून संरक्षण मागितले आहे.
अरुण पवार यांनी पुढे बोलताना सांगितले, की पिंपळे गुरव येथील स.नं. 87 हिस्सा नं 2 मधील विकसनास घेण्यात आलेल्या 130 गुंठे क्षेत्रातील माझी सहमती न घेता 62 गुंठे जागा चंद्रंरग डेव्हलपर्स अ‍ॅन्ड बिल्डर्स प्रा. लि.चे संचालक शंकर पांडुरंग जगताप यांनी 25 आर व ओम साई कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार विजय पांडुरंग जगताप यांनी क्षेत्र 37.035 आर अशी खरेदी करून घेतली. माझ्या नावे विकसन करारनामा व कुलमुखत्यारपत्र तयार करून माझी मोठी फसवणूक करण्यात आली. यासंदर्भात बँकांमधील धनादेशावर देखील माझी सही नसताना बनावट सही करून कोट्यवधी रूपये काढलेले आहेत.
तसेच वाकड येथील स.नं 173 हिस्सा नं. 1/1 ब चे क्षेत्र 6 आर म्हणजेच 6000 चौ. फुट एवढे क्षेत्र विठ्ठल बाळू जगताप व उमा अशोक दळवी यांच्या मालकीचे असून, मी आणि जीवन जाधव आम्हा दोघांनी विकसनास घेतली होती. सचिन कवडे हा जगताप यांचा भाचा आहे. वाकड येथील साई पार्कमधील कोणत्याही सदनिका विक्रीची बोलणी अथवा त्याच्याशी कोणताही करार केलेला नसतानाही त्यांनी आजपर्यंत एक रूपयाही दिलेला नाही. त्याचबरोबर रेरा बँक खात्यामध्ये एक रुपया देखील जमा केलेला नाही. सचिन कवडे हा शंकर जगताप यांचा भाचा असल्या कारणाने वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करून खोटी तक्रार दाखल करेल, अशी धमकी देत आहे. या संदर्भात 28 जून 2021 रोजी पोलिस आयुक्त पिं.चिं, सहाय्यक पोलिस आयुक्त वाकड यांच्याकडे रीतसर तक्रार अर्ज दिला होता. मात्र, राजकीय दबाव असल्यामुळे चौकशी न करता पोलिस अधिकार्‍यांनी आपणास दमदाटी करून 40 लाख रुपये सचिन कवडेला देऊन टाक, अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करू, असा माझ्यावर दबाव टाकत आहेत. सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल टोणपे हे माझे म्हणणे ऐकून न घेता, तसेच माझी कागदपत्रे न पाहता सचिन कवडे व शंकर जगताप यांचे मिटवून घे, नाहीतर तुझ्यावर गुन्हा दाखल करू, असा दबाव टाकत आहेत.
या प्रकरणात पोलिसांचा काही संबंध नसतानाही पोलिसांनी हस्तक्षेप करून माझ्यावर वारंवार दबावतंत्र वापरले आहे. या त्रासाला मी व माझे कुटुंब कंटाळले असून, आत्महत्या करून जीवन संपवावे की काय, अशा मनस्थितीत मी व माझे कुटुंब आहे. पोलिसाकडून वारंवार मानव हक्काचे उल्लंघन होत असल्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राज्य मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रार केली असून, माझ्याकडच्या कागदपत्रांची तपासणी करून आणि पोलिसांकडे असणार्‍या कागदपत्रांची तपासणी करून सत्य काय आहे, ते पहावे आणि मला न्याय देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त वाकड, राज्याचे गृहमंत्री, गृहसचिव, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली, राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्याकडे अर्ज करून न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन तक्रारअर्ज देणार असल्याचेही अरुण पवार यांनी सांगितले.

Previous articleसेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्री. दामोधर मंडलवार साहेब यांचा महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्कार
Next articleसिट्रस कंपनीच्या कामगारांना न्याय मिळवून देणार –वसंत सुगावे पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here