Home परभणी पीक विमा भरण्यासाठी हस्तलिखित बँक पासबुक स्वीकारण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे...

पीक विमा भरण्यासाठी हस्तलिखित बँक पासबुक स्वीकारण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

47
0

आशाताई बच्छाव

FB_IMG_1654935780105.jpg

पीक विमा भरण्यासाठी हस्तलिखित बँक पासबुक स्वीकारण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)

 

परभणी:- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा भरणा सुरु आहे. या पिकांचा विमा उतरवण्यासाठी शेतकन्यांकडून सातबारा, होल्डिंग, आधारकार्ड, पीकपेरा स्वयं घोषणापत्र तसेच बँक खाते पासबुकच्या झेरॉक्स प्रतची मागणी केली जाते. परंतु सध्या जिल्हा प्रशासनाने आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्र चालकांना पीक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकन्यांकडून संगणकाद्वारे प्रिंट केलेले पासबुकच स्वीकारावे हस्तलिखित पासबुक स्वीकारू नये असे आदेश दिले आहेत, परंतु, परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य शेतकरी हे त्यांचे आर्थिक व्यवहार परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेमार्फत करत असतात. तसेच पीक विमा भरते वेळेस शेतकरी ह्याच बँकेचा खाते नंबर देतात, काही अपवाद वगळता प्रत्येक शेतकऱ्याकडे हस्तलिखितचं बँक पासबुक आहे. आणि आता सर्वांना संगणकाद्वारे प्रिंट केलेले पासबुक बँकेला शक्य होणार नाही कारण एका शाखेला ४ ते ५ गावे जोडलेले आहेत काही शाखांना तर या पेक्षा ही जास्त गावे जोडलेले आहेत. तसेच नवीन संगणकाद्वारे प्रिंट केलेले पासबुक हवे असेल तर बँक कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याकडून १००/- रुपये वसूल करत आहेत त्याचा नाहक भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. तसेच पीकविमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ ही आहे. • एकदाच सर्व शेतकरी नवीन पासबुक घेण्यासाठी आल्यामुळे बँकेत गर्दी होत आहे त्यामुळे नवीन पासबुकचा बँकेत तुटवडा होत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना संगणकाद्वारे प्रिंट केलेले पासबुक मिळणे अशक्य आहे. तसेच कोरोना विषाणू पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आणि पीकविमा भरण्यासाठी देखील थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. संगणकाद्वारे प्रिंट केलेले पासबुकची अट घातली असल्यामुळे बरेच शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहू शकतात आणि त्यांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की, पीकविमा भरण्यासाठी हस्तलिखित पासबुक देखील स्वीकारण्यात यावे अन्यथा, शेतकन्यांच्या होणाऱ्या नुकसानीस राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घेतला नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here