Home नाशिक साल्हेर किल्ल्यावरील घटनेत मृतात मालेगांवच्या तरुणाचा समावेश; एक जखमी..!

साल्हेर किल्ल्यावरील घटनेत मृतात मालेगांवच्या तरुणाचा समावेश; एक जखमी..!

51
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220715-192227_WhatsApp.jpg

साल्हेर किल्ल्यावरील घटनेत मृतात मालेगांवच्या तरुणाचा समावेश; एक जखमी..!
(निलेश भोये/गोपीनाथ भोये युवा मराठा न्युज नेटवर्क)
साल्हेर- आज साल्हेर येथील घटनेत मृत पावलेला युवक हा मालेगांव शहरातील असून,त्यासोबत जखमी झालेला युवक व इतर १० दहा युवक आज साल्हेर किल्ल्यावर ट्रेकींग साठी गेले होते अशी माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,आज मालेगांव शहरातील एकूण बारा मुले सटाणा तालुक्यातल्या साल्हेर किल्ल्यावर ट्रेकींगसाठी आलेली होती,त्यापैकी कडयावरुन पाय घसरल्याने भावेश शेखर अहिरे रा.मालेगांव वय २१ हा किल्ल्यावरुन खाली कोसळल्याने मृत पावला तर भावेशच्या हाताला धरलेला दुसरा तरुण मनिष सुनील मुठेकर रा.मालेगांव वय २१ हा खोल दरीत कोसळल्याने जखमी झाला आहे.हि घटना साधारणतः दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.याबाबत जायखेडा पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होत,पोलिसांनी पुढील शोधकार्य सुरु केले.घटनास्थळावर मालेगांवचे अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी स्वतः भेट देत तपास पथकाला शोधकार्यात मदत केली.तर जखमी मनिष सुनील मुठेकर यास स्वतः चंद्रकांत खांडवी यांनी आपल्या खांद्यावर उचलून आणत अवघड असलेल्या साल्हेरच्या दरीतून बाहेर काढल्याने पोलिस खात्याचे विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.या घटनेचा पुढील तपास जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नाईक रवि भामरे हे करीत आहेत.

Previous articleब्रेकींग न्युज…! साल्हेरच्या किल्ल्यावरुन दोन जण पडल्याने एकाचा मृत्यू दुसऱ्याचा तपास सुरु!
Next articleजिंतूरात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या शहरातील बलसा रोडवरील चित्तथरारक घटना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here