Home विदर्भ पावसाळ्यात साथरोग उद्भभवणार नाहीत म्हणून उपाययोजना करण्याचे पालकमंत्र्याचे सुतोवाच

पावसाळ्यात साथरोग उद्भभवणार नाहीत म्हणून उपाययोजना करण्याचे पालकमंत्र्याचे सुतोवाच

182
0

राजेंद्र पाटील राऊत

वाशिम:- (देवेंद्र कलकोट तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                      पावसाळ्याच्या दिवसात कोरोनाबरोबरच साथ रोग उद्भवणार नाहीत या अनुषंगाने नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदींनी मान्सूनपूर्व कामे चोखपणे पार पाडावी असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वीच दिले आहेत या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने नालेसफाई नाली बांधकाम आदी कामे वेळेपूर्वी करून कुठे घाण पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी संपूर्ण गावात साचत असून नाल्यांची साफसफाई नसल्यामुळे नाल्यातील सर्व पाणी रोडवर साचत आहे घाण पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन साथरोग बळावत असल्याचे दिसून येते डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे वाशीम शहरात हिवताप डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत सरकारी रुग्णालय आणि खासगी रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल होत असल्याचे चित्र असतानाही शहरात धूर फवारणी नाही त्यामुळे नगर परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्येक वार्डात धूर फवारणी करून नाल्यात पाणी साचणार नाही याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Previous articleनांदेड  जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपू लागली.
Next articleअकोला जिल्ह्यात दुचाकी चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here