Home नांदेड पंढरीच्या वारीहून परतलेल्या भाविकांचा गुरूंच्या हस्ते सत्कार.

पंढरीच्या वारीहून परतलेल्या भाविकांचा गुरूंच्या हस्ते सत्कार.

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0019.jpg

पंढरीच्या वारीहून परतलेल्या भाविकांचा गुरूंच्या हस्ते सत्कार.

नायगाव तालुका प्रतिनिधि निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकाराम… पंढरीनाथ महाराज की जय.. च्या जयघोषात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात गेलेल्या प्रत्येक वारकरी विठ्ठलाचे पदस्पर्श अन् मुखदर्शन घेऊन धन्य झालो असल्याचे पंढरी च्या वारी हून परतलेल्या भक्तांनी आपला अनुभव सांगितला. वारीमध्ये भक्तिरसात तल्लीन होऊन विठू नामाचा गजर करीत कधी वेळ गेला ते लक्षात सुद्धा आले नसल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश , तेलंगणा राज्यातील भावीकानी मोठ्या प्रमाणात वारीला जात असतात. दोन वर्षाच्या कोरोणा महामारिमुळे भक्तांना वारीला जाता आले नाही मात्र येवेळेस त्यानी भक्ती भावपूर्ण वारी सफल झाल्याचे बोलून दाखवले.
वारी पूर्ण झाल्यानंतर भाविक आपापल्या गावी परतले आहेत. नायगाव तालुक्यातील देगाव येथील वारकरी परतल्या नंतर दत्त मठ संस्थान चे मठपती गुरू गंगाबन महाराज यांनी वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी गंगाधर सावरगावे,बालाजी कदम, सतीश वाडे, मनोज बच्चेवार, ओमकार पाटिल, राजेश्वर बच्चेवार, ज्ञानेश्वर आकले, सुनीता कदम,ललिता बच्चेवार, शंकर मोरे आदी वारकरी उपस्थित होते.

Previous articleमहत्त्वाचे मंत्रिमंडळ बैठक निर्णय बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात
Next articleमतदार कार्डासोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून विशेष मोहिम
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here