Home पालघर मतदार कार्डासोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून विशेष मोहिम

मतदार कार्डासोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी 1 ऑगस्ट पासून विशेष मोहिम

88
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220714-174332_Google.jpg

मतदार कार्डासोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी
1 ऑगस्ट पासून विशेष मोहिम

पालघर (वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यामध्ये मतदार कार्ड सोबत आधार क्रमांक लिंक करण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून विशेष मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे.
आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे. अर्ज क्र.6 ब बीएलओ (मतदान केंद्र स्तरीय अधिकारी) यांच्या मार्फतही घरोघरी भेटी देऊन गोळा करण्यात येईल. विशेष शिबिरांच्या आयोजनामधूनही अर्ज क्र. 6 ब गोळा करण्यात येईल. मतदारांकडे आधारक्रमांक नसल्यास अर्ज क्र.6 ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रांपैकी एक कागदपत्र सादर करता यावे . उदा. पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र व राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागातील ओळखपत्र मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे एच्छिक आहे. केवळ आधार सादर करण्यास असमर्थतेमुळे मतदार यादीतून नाव काढून टाकले जाऊ शकत नाही.

अशी होईल नोंदणी

प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरूपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. 17 जून 2022 च्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्र.6 ब मध्ये भरून देऊ शकतो. आवश्यक अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती मतदारांना उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब ERO Net, GARUDA App, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध करून देण्यात येईल.
तरी मतदार यादीतील नावाशी दि. 1 ऑगस्ट 2022 पासून मोठ्या संख्येने आधार क्रमांकाची जोडणी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा व पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, यांनी केले आहे.

Previous articleपंढरीच्या वारीहून परतलेल्या भाविकांचा गुरूंच्या हस्ते सत्कार.
Next article५६ गाव पाणीपुरवठा योजना बारगळली ऐन पावसाळ्यातही कौळाणे,व-हाणे गावे तहानलेलीच
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here