• Home
  • डाॅ.बाळासाहेब दास यांच्या समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

डाॅ.बाळासाहेब दास यांच्या समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210215-WA0040.jpg

” डाॅ.बाळासाहेब दास यांच्या समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
सोलापूर.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील
टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी, येथील मराठी विभाग प्रमुख डाॅ.बाळासाहेब दास लिखित ” ग्रामीण कथा आणि रा.रं.बोराडे ” . या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व महाराष्ट्रातील ख्यातनाम समीक्षक डाॅ.रमेश वरखेडे ( नाशिक ) व ज्येष्ठ विचारवंत डाॅ.विलास खोले (पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.संजय (मामा) शिंदे , उद्योगपती रामभाऊ जगदाळे व प्रा . आशिष रजपूत उपस्थित होते . या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. प्राचार्य , डाॅ.महेद्र कदम यांनी भूषविले . या प्रसंगी डाॅ.रमेश वरखेडे म्हणाले, डाॅ.दास .यांनी कथनवाड्,मयाचा सखोल आढावा घेऊन कथनवाड्,मयातील आशयाच्या , शैलीच्या व निवेदनाच्या अनुषंगाने ग्रामीण कथा वाड्,मयामध्ये कसकसे बदल होत गेले तसेच ग्राम जीवनावर दुष्काळाचा , सरंजामशाहीचा , अस्मानी , सुलतानी व मानवी संकटांचा सामना करणार्या शेतकर्याच्या वर्तमान जीवनप्रणालीबाबत डाॅ.दास यानी बहूआयामी आणि सखोल चिंतन करून वस्तुनिष्ठ निरीक्षणे नोंदवलेली आहेत .तर प्राचार्य, डाॅ.महेंद्र कदम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून एखाद्या वाड्,मय प्रकाराची वस्तुनिष्ठ समीक्षा कसी असावी याचा वस्तुपाठ म्हणजे डाॅ.दास यांचा हा समीक्षा ग्रंथ आहे . अशा भावना व्यक्त करून डाॅ.दास यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डाॅ.दास यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी मला शेतकर्याच्या आत्महत्या , सततचे दुष्काळाचे सावट , जन्मांतरीची अवर्षणप्रवण स्थिती व कृषिधनाची होत असलेली वाताहत या गोष्टी खर्या अर्थाने लेखनास प्रवृत करतात असे सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येनणे उपस्थित होते . प्रा.संजय साठे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

anews Banner

Leave A Comment