Home पुणे विज कंपनीच्या डि.पी.चोरणा-या टोळीला यवत पोलिसाकडून अटक

विज कंपनीच्या डि.पी.चोरणा-या टोळीला यवत पोलिसाकडून अटक

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0032.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत नागणे

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी टोळी जेरबंद
तब्बल २६ गुन्हयातील फरार म्होरक्या कडुन आणखीन ४ गुन्हे उघडकीस
यवत गुन्हे शोध पथकाची कारवाई

दिनांक ०२/०७/२०२२ रोजी मौजे बोरीभडक, ता.दौंड जि. पुणे येथील शेत जमीन गट नं.१४/१ मधील शिवाजी धर्मा गायकवाड यांचे शेतात असलेली डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्यााने स्ट्रक्चर वरून नट बोल्ट खोलून खाली पाडून त्यातील ऑइल सांडून नुकसान करून त्यातील अंदाजे एकूण १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा कोणीतरी अज्ञात चोरट्यााने चोरून नेले बाबत यवत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होता. दिनांक ०८/०७/२०२२ रोजी यवत पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की यवत पोलीस स्टेशन हद्दीतील डीपी चोरणारे संशयित राहू शिवाजी चौक येथे येणार असलेची खात्रीशीर माहिती मिळालेने सदर पोलीस पथकाने गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ सह मौजे राहू छत्रपती शिवाजी महाराज चैक येथे सापळा लावून थांबले असता एक संशयित कार मधील चार इसम राहू येथील लक्ष्मीआई मंदिराजवळ आले असता यवत गुन्हे शोध पथकाने त्यांना मारुती ८०० कारसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर संशयित इसमांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने राहु, कानगाव, पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भिवर असे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २८ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले असून इसम नामे १) दत्ता अशोक शिंदे वय २८ वर्षे, रा.राहु, थोरले विहीर, ता.दौंड जि.पुणे २) राज मच्छिंद्र वानखडे वय १९ वर्षे, रा.केडगाव, म्हसोबाचा मळा, ता.दौंड, जि.पुणे. मुळ रा.बिडगाव, ता.मुर्तुजापुर, जि.अकोला ३) विशाल मनोहर सोनवणे वय ३० वर्षे रा.सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे ४) महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार वय २९ वर्षे, रा.केडगाव, ता.दौंड, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हयातील चोरीचा माल इसम नामे आमजद पाशामियाॅ खान वय ४० वर्षे, रा. साईनगर, कोंढवा, ता.हवेली, जि.पुणे यास विकल्याने त्यास सदर गुन्ह्याचेकामी ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेकडुन कि.रू १७६७५०/- रू च्या ३५०किलो तांब्याच्या तारा जप्त करणेत आलेल्या आहेत. तसेच इतर आरोपींकडुन गुन्हयात वापरलेल्या दोन मारूती ८०० कार, एक पॅशन प्लस मोटार सायकल व चार मोबाईल असा १६०,०००/- रू किमतीसह एकुण ३,३६,७५०/- रू चा मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.
सदर आरोपींना मा.अपर व सत्र न्यायालय साो बारामती यांनी ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली असून वरील आरोपींकडून यवत पोलीस स्टेशन कडील रोहित्र चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत ती माहिती खालीलप्रमाणे.
१)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५३९/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५१५/२०२२, भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
३) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४८४/2022, भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
४)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.५०६/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
असे एकूण ४ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून आरोपींकडून ३,३६,७५०/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपी नामे दत्ता अशोक शिंदे रा.राहु थोरली विहीर, ता.दौंड, जि.पुणे हा रेकाॅर्ड वरील गुन्हेगार असुन तो खालील २६ गुन्हयांमध्ये निष्पन्न झालेला फरार होता.
१) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४८/2022,भा.द.वि.कलम 397,394,34
२) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४९/2022,भा.द.वि.कलम 385,387,326,34,
३)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१०२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
४)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
५)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.८४/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
६)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.११२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
७)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१२७/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
८)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.53३/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
९)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२५१/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१०)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३६७/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
११)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३८३/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१२)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४४८/२०२१ भा.वि का.क.१३६,भा.द.वि.४२७
१३)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१८४/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१४)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२५२/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१५)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३९५/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१६)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४२१/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१७)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४३९/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१८)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.६६६/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१९)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.८०३/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२०)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.८३७/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२१)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.८५७/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२२)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.८७६/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२३)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.९०३/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२४)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१५३/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२५)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१११/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
२६)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.६४०/२०२१ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
तसेच आरोपी नामे महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार रा.धुमळीचा मळा, केडगाव, ता.दौंड, जि.पुणे व राज मच्छिंद्र वानखेडे रा.केडगाव, म्हसोबाचा मळा, ता.दौंड, जि.पुणे हे खालील ११गुन्हयांमध्ये फरार होते.
१) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४८/२०२२,भा.द.वि.कलम ३९७,३९४,३४
२) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.४९/2022,भा.द.वि.कलम ३८५,३८७,५२६,३४,
३)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१०२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
४)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
५)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.११२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
६)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१२७/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
.द.वि.४२७
७)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२५१/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
८)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३६७/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
९)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३८३/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
१०)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१३२/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
११)यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१३७/२०२२ भा.वि. का.क.१३६,भा.द.वि.४२७
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पो.हवा. निलेश कदम, पो.हवा. गुरू गायकवाड, पो.हवा. गणेश कर्चे, पो.ना. अक्षय यादव, पो.ना. रामदास जगताप, पो.काॅ.प्रविण चैधर, पो.काॅ.मारूती बाराते, पो.हवा. सचिन गायकवाड,पो.ना. सुनिल कोळी, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here