Home गडचिरोली बंडखोर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ गडचिरोलीत शिवसेना उतरली रस्त्यावर;..!

बंडखोर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ गडचिरोलीत शिवसेना उतरली रस्त्यावर;..!

60
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0042.jpg

बंडखोर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ गडचिरोलीत शिवसेना उतरली रस्त्यावर;..!

शिवसेना सहसपंर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री.अरविंदभाऊ कात्रटवार यांच्यासह संपुर्ण शिवसैनिक मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी,

शिवसेनेच्या वतीने बंडखोरांविरोधात निदर्शने व रॅली

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेेनेशी गद्दारी करून शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या विरोधात उघडपणे बंड पुकारला आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गडचिरोली येथील शिवसैनिक आक्रमक झाले असून आज 26 जुन रोजी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात शिवसेना सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.
शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांविरोधात संताप व्यक्त करीत आहेत.त्याचे पडसाद गडचिरोली सुध्दा उमटले असून शिवसेना सहपंर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवर यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात संताप व्यक्त केला. आज दुपारच्या सुमारास शिवसैनिक खांदयावर भगवा दुपट्टा व हातात भगवा झेंडा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थनार्थ इंदिरा गांधी चौकात गोळा झाले होते.

हिंदू हद्यसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी शिवसेना निर्माण केली. बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना प्रेमाची ऊब देऊन त्यांना घडविले. शिवसेनेमुळे अनेकांना आमदार ते मंत्री पदावर पोहचण्याची संधी मिळाली. मात्र एकनाथ शिंदेसह ज्या आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब व शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला आहे, हे कृत्य आम्ही शिवसैनिक कदापीही खपवून घेणार नाही.अशा बंडखोरांना शिवसैनिकांनी चांगला धडा शिकवावा, असा इशाराही शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी निषेध व्यक्त करतांना दिला.

शिवसेनेचा वारसा संघर्षाचा असून कितीही संकटे आली तरी शिवसैनिक कधीही डगमगणार नाही. हातात भगवी पताका घेऊन मा.बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून कोणत्याही संकटाशी सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांशी लढा दिला त्याचप्रमाणे शिवसेनेचा विश्वासघात करणाऱ्या बंडखोरांचा सामना करण्यास शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब सक्षम आहेत. गडचिरोली जिल्हयातील आम्ही समस्त शिवसैनिक मा.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहोत,अशी भावना शिवसेना सहपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी व्यक्त केली याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री.अरविंद भाऊ कात्रटवर,सह संपर्क प्रमुख विलास कोडापे,जिल्हा संघटक विलास ठोबरे,ज्ञानेश्वर बगमारे,यादवजी लोहबरे,संदीप भुरसे,गणेश दहलाकर,संजय बोबाटे, नानाजी काळबन्धे,शामराव कुकुड़कर,अरुण बारापत्रे,निकेश लोहबरे, स्वप्निल खांडरे,राहुल सोरते,प्रशांत ठाकुर,राजू जवादे,अमित बनबले,दिलीप चनेकर,चुकराम मुंघाते,सूरज उइके,संदीप अलबनकर, उमाजी चनेकर,मनोहर लाजुरकर,संदीप चनेकर,विलास वासेकर, गजानन भानेडेकर,त्र्यम्बक फुलझेले, तुकाराम फुलझेले, श्रीकांत शेजारे,सुनील रंदीये,महेंद्र शेजारे,विकास वट्टी,रामराव वट्टी,प्रशांत सिदाम, सुधीर सिडाम, अनिकेत उन्दिरवाडे, संतोष वसुनाके,रमेश चन्द्रगिरी,चंद्रकांत मस्के, विशाल शेडमाके,मुखरू वट्टी,दिलीप वहलादे,बालकृष्ण एलमुळे,अमित हुलके, लोमेश सेलोते,अभिषेक सेलोते,हरबा दजगये,माणिक ठाकरे,जगह चापले, रामदास भयाल,यशवंत लकुड़वाहे,निरंजन लोहबरे, कैलास आवारी, मनोज ठाकुर,यादव चौधरी, परवीन निसार प्रशांत ठाकूर , संतोष कुशनाके, दिनेश गिरोले, सुधीर सिडाम , पंकज टिकले , रूपेश कोसमसिले , पूरण उन्दिरवाड़े , प्रज्वल चंद्रगिरे, मिलिंद राउत , दिगामबर कारते अविनाश उन्दिरवाड़े , मारोती गुरनुले , बंडूजी जेंगटे , दामोदर जेंगटे ,गिरिधर मोहूर्ले , ललित भेंडारे , निर्मल वाडई , अन्ना मड़ावी , रितेश सहारे , अंकुश गावतुरे , जितु गावतुरे, उमाकांत जेंगते , मुकेश गुरनुले, गणेश दहेलकर , यादव चौधरी, मनोहर ठाकरे ,मधुकर गेडाम ,जयेंद्र चनेकार , उमाजी पानसे , किशोर दहेलकर , नामदेव नेताम , प्रवीण पानसे , निम्बाजी तिवाडे , जीवन मलोटे , भुजंग गेडाम , कैलाश आवारी , जीवन कुरडकर, माधव चौधरी , बालकृष्ण येलमुले, दिलीप वलादे , कवडू धंदरे , विश्वानाथ धंदरे, अमित हुलके , लोकेश सेलोटे , आशिष सेडमके , गुरुदेव सेलोटे यांच्या सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here