Home नाशिक तीर्थक्षेत्र मूल्हेर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी

तीर्थक्षेत्र मूल्हेर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220710-WA0025.jpg

तीर्थक्षेत्र मूल्हेर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी
संदीप गांगुर्डे पिंगळवाडे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मूल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी मूल्हेर गावात वै. काशी राज महाराज यांचे शिष्य वै. परमपूज्य उद्धव महाराज यांची समाधी व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी.
कोरोना या माहामारीच्या काळात साधारण दोन वर्षे महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होती त्यात मूल्हेर येथील संस्थान हि बंद होते. त्यामुळे साधारण मंदिर दोन वर्ष बंद असल्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शन घेता आले नाही. परंतु या वर्षी शासनाच्या आदेशाने पालन करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या मंदिरात साधारण दिवसभरात चार ते पाच हजार भाविकांची हजेरी लागली. या मंदिरात परिसरातील करंजाडी खोरे व मोसम खोरे या परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने आले होते. विशेष म्हणजे मंदिर प्रशासनाकडून आलेल्या भाविकांसाठी उपवासाचे फराळ व चहाचे वाटप ठेवण्यात आले होते. तसेच आलेल्या भाविकांना कोरोना या आजाराचे सर्व बंधने पाळणे गरजेचे होते. त्यात सामाजिक आंतर, तोंडाला मास्क, जास्त गर्दी होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत मूल्हेर हे लक्ष देऊन होते. या संस्थांचे बहुतेक बांधकाम हे लाकडी स्वरूपाचे आहे. तसेच मंदिर परिसरात अगदी नयनरम्य चिंचेच्या झाडांचे मोठे पटांगन आहे. या ठिकाणी गावातील किंवा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रशस्त असे मंगल कार्यालय अगदी माफक दरात उपलब्ध आहे. अशा अनेक सोयी सुविधांनी सज्ज असलेले हे देवस्थान. याच परिसरात वैकुंठवासी ह. भ. प. रघुराज महाराज यांचेही समाधी स्थळ आहे.या स्थळालाही भाविक आवर्जून दर्शन घेतात. रघुराज महाराज यांचे सुपुत्र व आजचे मठाधिपती श्री भक्तराज महाराज यांच्या म्हणून यानुसार तब्बल दोन वर्षानंतर मंदिरात भाविकांची गर्दी बघून आम्हाला व ग्रामस्थांना मोठा आनंद झाला आहे यापुढेही गर्दी अशीच राहो हीच सदिच्छा. या पावन दिनी आषाढी एकादशी निमित्ताने या मंदिरात पहाटे काकड आरती त्यानंतर दुपारी बारा वाजता महा आरती,सायंकाळी हरिपाठ, तसेच सायंकाळी नऊ वाजता ह भ प नितीन महाराज मुडावतकर यांची जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

तब्बल दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शासनाने सर्व धार्मिक स्थळ खुले केल्या नंतर त्यात उद्धव महाराज समाधी खुले झाले त्यामुळे भाविकांना व आम्हालाही मनापासून आनंद झालेला आहे

उद्धव महाराज संस्थान मठाधिपती
भक्तराज महाराज

Previous articleराळापेठ जिल्ह्या परिषद शाळेत वीज कोसळून तीन विद्यार्थी किरकोळ जखमी ; विठ्ठलवाडा येथील शेतकऱ्यांचे शेतिउपयोगी साहित्य जळून राख
Next articleजिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 58.80 मि.मी. पाऊस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here