Home मुंबई डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतीत जीवनाचे तत्वज्ञान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतीत जीवनाचे तत्वज्ञान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

43
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231018-062950_WhatsApp.jpg

डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतीत जीवनाचे तत्वज्ञान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रवीण क्षीरसागर प्रतिनिधी युवा मराठा न्युज

जहांगीर कला दालनात कलाकृतींचे प्रदर्शन

मुंबई, दि. १७ : भारताला सांस्कृतिक आणि अध्यात्माची महान परंपरा लाभली आहे. चित्रकार डॉ. अर्चना श्रीवास्तव यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून जीवनाचे तत्वज्ञान पाहावयास मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

प्रसिद्ध चित्रकार डॉ. अर्चना श्रीवास्तव यांनी ‘आध्यात्मिक प्रतिबिंब’ या विषयावर जहांगीर कला दालनात भरविलेल्या चित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज सायंकाळी उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. श्रीवास्तव ह्या माजी मुख्य सचिव तथा राज्यसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्या पत्नी आहेत. उद्घाटन सोहळ्याला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव डॉ . श्रीकर परदेशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाला लाभलेल्या सांस्कृतिक आणि अध्यात्माच्या वारश्याचे संवर्धन करण्याचे काम डॉ. श्रीवास्तव यांच्या कलाकृतीतून होत आहे. डॉ. श्रीवास्तव यांची चित्रे महत्वपूर्ण असून त्यांच्यातून जीवनाचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत जाण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी चित्र प्रदर्शनाची पाहणी केली. डॉ. श्रीवास्तव यांनी चित्रांविषयीची माहिती दिली. यावेळी वरीष्ठ सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, सांस्कृतिक, सामाजिक आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी अभिनेता जितेंद्र, राकेश रोशन, जॅकी श्रॉफ, संजय दत्त, सुनील शेट्टी आदींनी प्रदर्शनाला भेट देत पाहणी केली.

Previous articleभारत २०३६ च्या ऑलिंपिकसाठी सज्ज – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Next articleतळेगावच्या जनरल मोटर्स प्रकल्पातील कामगारांच्या ठामपणे पाठीशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here