Home गडचिरोली सर्वोदय वार्डातील खुले चेंबर देत आहेत मृत्यूला आमंत्रण. नगर परिषद प्रशासन झोपेचे...

सर्वोदय वार्डातील खुले चेंबर देत आहेत मृत्यूला आमंत्रण. नगर परिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन.

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0025.jpg

सर्वोदय वार्डातील खुले चेंबर देत आहेत मृत्यूला आमंत्रण.
नगर परिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन.
गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
पटवारी भवना पासून ते गुजरी जाणाऱ्या रोड वरील नालीला चेंबर वर झाकण बसवण्याची मागणी,सर्वोदय वार्डातील उमाकांत बाळेकरमकर यांच्या घराजवळील रस्ता अरुंद असून सतत वर्दळीचा असतो. रस्त्यावर एका बाजूला सायकल व मोटार सायकल ठेवलेले असतात. त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनधारकांना दुसऱ्या बाजूने जाताना रस्त्यावरील खड्डे दृष्टीपथास पडत नसल्याने अनेक गाड्या खड्यात गेलेल्या आहेत. रात्रीच्या वेळेस रस्त्यावरील स्ट्रीट लाईट गेले की त्या रस्त्यावरुन जाणाऱ्यांना देखील याचा फटका बसून लहान मुलांबरोबर मोठ्या माणसांनाही खड्यात पडून हातापायाला इजा होत आहे, तेव्हा सदर खड्यात पडून एखाद्याचा मृत्यू होण्याआधीच खड्यावरील झाकणाची व्यवस्था केल्यास एखाद्याचे प्राण जाण्यापासून रोखता येईल. परंतु त्याकडे अधिक काळ दुर्लक्ष केल्यास आणि एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला नगर परिषदेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार राहील असे मत व्यक्त करून लवकरात लवकर झाकण बसवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सर्वोदय वार्डातील जनतेनी केलेली आहे.

श्री विलास निंबोरकर
अंनिस,सामाजिक कार्यकर्ते
👇👇
तात्काळ नालीवरील झाकण न लावल्यास वार्ड वासीय काढणार नगरपरिषद वर मोर्चा.

अंकुश भालेराव
इंजिनयर नगर परिषद
गडचिरोली ..
👇👇
संबंधित कंत्राटदाराला नाली वरील झाकण बसवण्याचे सक्त निर्देश दिलेले आहेत तरी लवकरात लवकर नालीवरील झाकण बसवण्याच्या कामाला गती येईल ..

Previous articleगडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा सौ.योगीताताई पिंपरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा!
Next articleआगळीवेगळी जगावेगळी प्रेमकहाणी..रंभा;पंडित!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here