आशाताई बच्छाव
भऊर येथे विवाहितेची आत्महत्या
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – तालुक्यातील भऊर येथे 35 वर्षीय महिलेने घराच्या पत्र्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 22 रोजी सायंकाळी घडली आहे.
भऊर येथील शितल बापू पाटील(35) ही महिला पती, दोन मुले व सासु सासऱ्यांसह राहत होती. त्यांच्याजवळ दीड एकर शेती होती. त्यांच्या पतीने एका फासनान् कंपनीकडून साडे चार लाखांचे कर्ज काढून मालवाहू पिकअप वाहन घेतले. त्यात बचत गटाचे देखील चार लाखांचे कर्ज.हे कर्ज कसे फेडणार याची विवाहीतेला सतत चिंता लागलेली होती
22 रोजी सायंकाळी 7 नंतर बाहेर गेलेली विवाहीतेची दोन्ही मुले व पती घरी आले तेव्हा विवाहीता घरातील छताच्या पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आली.
याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात विवाहीतेच्या पतीेने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.






