Home जळगाव चाळीसगावात पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणातून तलवारीने हल्ला-एक गंभीर

चाळीसगावात पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणातून तलवारीने हल्ला-एक गंभीर

64
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231028-071107_Google.jpg

चाळीसगावात पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणातून तलवारीने हल्ला-एक गंभीर
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार दिल्याच्या कारणातून चाळीसगाव येथे मंडप डेकोरेटर्सवर तलवार व कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माजी नगरसेवकासह पाच जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अजय नाना पवार (28) रा. आनंदवाडी, चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी आरोपीतांच्या नातेवाईकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तसेच आरोपीच्या नातेवाईकाला मारहाण करण्याच्या कारणातून संशयित 5 जण व त्यांचे इतर दोन ते तीन अनोळखी साथीदार अशांनी गैरकायदा मंडळी जमवून फिर्यादीस शिवीगाळ केली.तसेच मारून टाकण्याची धमकी देत फिर्यादीच्या कमरेवर कोयत्याने तर पाठीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.तसेच लाथाबु्न्नयांनी मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना दि.25 ऑ्नटोबर रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास इच्छापुर्ती हनुमान मंदिराजवळ घडली.

याप्रकरणी अजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मालजी घोडे, रितेश मालजी घोडे,तुषार उर्फ चोंग्या जाधव,भोला अजबे, ऋषिकेश उर्फ मायकल पाटील यांच्यासह इतर दोन तीन अनोळखी मुले यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 307,323,143,144,147,148,जिल्हा दंडाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन 37(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.

Previous articleभऊर येथे विवाहितेची आत्महत्या
Next articleसातलवाडा येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here