Home संपादकीय आगळीवेगळी जगावेगळी प्रेमकहाणी..रंभा;पंडित!!

आगळीवेगळी जगावेगळी प्रेमकहाणी..रंभा;पंडित!!

41
0

राजेंद्र पाटील राऊत

Screenshot_20220708-195317_Google.jpg

आगळीवेगळी जगावेगळी प्रेमकहाणी..रंभा;पंडित!!
मालेगांवजवळचे कौळाणे (नि.) हे माझं आजोळ अर्थात माझ्या आईचे माहेर!माझ सगळं बालपणच या गावात गेलेले…माझा सख्खा मामा पंडीत दगडू बोरसे हा मोठा नावाजलेला व्यक्ती होता.प्रत्येक बाबतीत नावाप्रमाणेच पंडीत होता.आणि तसा त्याचा दरारा देखील होता.मी माझ्या लहानपणी माझ्या पंडीतमामाचे पाहिलेले सक्सेसफुल प्रेमप्रकरण आठवले तरी खरोखरच प्रेमवीर म्हणून माझा मामा ग्रेटच होता.नाही तर आजकाल प्रेमाच्या नावाखाली युज अँण्ड थ्रो ची परंपरा व रंडीबाजी बघितली तर “खरे प्रेम” आता औषधालाही शोधून सापडणार नाही.पण…माझ्या लहानपणी बघितलेली ही प्रेमकहाणी खरोखरच अविस्मरणीय व अजरामर ठरली.मी लहान असताना माझे वडील वारल्यामुळे मला साहजिकच कौळाणे गावात मामाचा सहारा व आधार घ्यावा लागला.त्याकाळी माझा बराच वेळ हा माझ्या पंडीत मामासोबत जायचा.पंडीत मामाचे लग्न झाले होते किंवा नाही,हे तर काही मी बघितलेले नाही.पण…आई सांगायची पंडीत मामाचे लग्न आघार येथीलच महिलेशी झालेले होते.मात्र बहाद्दरने फक्त दोन ते तीनच दिवसात आपल्या बायकोला कायमचेच सोडून दिले.पुन्हा कधी तिच्या रस्त्यालाही गेला नाही,हे सगळ कशासाठी तर आपल्या प्राणप्रिय प्रेयसीसाठी म्हणजेच भिलाटीतल्या रंभाबाई ठाकरेसाठी..अतोनात प्रेम होते एकमेकांचे एकमेकांवर..रंभाबाई देखील काही कमी नव्हती.दिसायला अत्यंत देखणी व सुंदर असलेल्या रंभाबाईचे देखील लग्न झाले तिकडे जळगाव जिल्ह्यातील अमळनेरला!पण..पहिले मुळ म्हणून परत माहेरी आलेली रंभा देखील पुन्हा कधी सासरी गेलीच नाही.फक्त पंडीतवरील प्रेमासाठी…याला म्हणतात त्याग व समर्पणाची भावना.”जियेंगे तो साथ साथ,मरेंगे तो साथ साथ” त्यापुढील सगळं आयुष्य मग पंडीत मामाने रंभासोबत भिलाटीतच काढले.पांढरेशुभ्र धोतर अंगात पांढराच शर्ट डोक्यावर एखाद्या पुढाऱ्यांला लाजवेल अशी कांजीची गांधी टोपी अशी पंडीत मामाची वेशभुषा होती.तर रंभाचे राहणीमान सुध्दा काही कमी नव्हते.अंगावर भरजरी काष्टी साडी, नाकात कोल्हापूरी नथ, हातावर दणकडे तोंडात पानाचा विडा.अशी ही प्रेमीयुगलाची जोडी आजपासून सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी कौळाणेत खुपच नावलौकिक राखून होती.गावाजवळच्या झरी नदीकाठी एक छोटीशीच भिलाटी होती.पीरसाहेब बाबाच्या देवस्थानाशेजारीच रंभाचे घर होते.तेथेच पंडीत व रंभाने आपला प्रेमाचा आशियाना उभारलेला होता.आणि उदरनिर्वाह व पोट भरण्यासाठी दोघांनी छानपैकी गावठी दारु विक्रीचा व काही म्हशी पालनाचा व्यवसाय सुरु केलेला होता.त्यामुळे जातीने रंभा जरी भिल्ल समाजाची असली,तरी तिच्या घरी..अर्थातच माझ्या मामाच्या घरी दुधदुभते,दही,ताक लोणी याची कधीच कमतरता नव्हती.माझ्या लहानपणी आई कुठे शेतात कामाला गेली तर मला साहजिकच सांभाळण्याची जबाबदारी पंडीतमामावर असायची.तो मला खांद्यावर बसवून रंभाच्या घरी घेऊन जायचा.तेथेच मग माझा दिवसभर दही दुध ताक खाण्यात दिवस जायचा.पण..कधी मी चुकून मामाला त्रास द्यायला सुरुवात केलीच तर मग एका कपामध्ये मला थोडीशी दारु पाजून,रंभा पंडीतची जोडी रोमांस करायला मोकळी…मात्र काही असो,माझ्या पंडीत मामाला मुलगा किंवा मुलगी नव्हती तसेच रंभालाही अपत्य नव्हते म्हणून की काय दोघांनी मात्र मला खरोखरच जीवापाड जीव लावलेला आहे.मला आठवते तोपर्यंत सगळ काही त्यांचे सुस्थितीत चालू होते.पुढे पुढे दोघही शरीराने थकले.सतत आजारी राहू लागले.पंडीतमामा आमच्या घरी राहू लागला.तर रंभा तिच्या भावाच्या घरी राहू लागली,मात्र अशाही परिस्थितीत दोघांचेही एकमेकांवरील प्रेम तुसभर देखील कमी झाले नाही.रंभा पंडीतला शासनाच्या निराधार योजनेतून पेन्शन पगार मिळायचा.पंडीत मामाचा पगार झाला तर मामा चहा साखर घेऊन रंभाच्या घरी जायचा.मग दोघ मनसोक्त गप्पा मारायचे आणि मामा मग रंभाला काही थोडे फार खर्चायलाही पैसे टाकून यायचा.हे त्यांचे नित्याचेच झाले होते.समजा रंभाचा पगार आला तर रंभा कुणाच्याही हातून पंडीत मामाला बोलवून घ्यायची,व मामाला खर्च पाण्याला पैसे द्यायची.दोघेही शरीराने थकले होते,पण मनाने कधीच थकले नाहीत.त्यांचा जन्म जणू काही एकमेकांसाठीच झालेला होता.समजा मी चुकूनही कधी रंभा राहत असलेल्या तिच्या भावाच्या घराकडे गेलो तरी ती मोठ्या आस्थेवाईकपणे पंडीतमामाची माझ्याजवळ चौकशी करायची व खबर घ्यायची.पुढे कालांतराने तब्बेतीच्या व प्रकृती अस्वास्थामुळे पंडीत मामाचे निधन झाले.आणि त्यानंतरच्या काही दिवसातच रंभाचे देखील आपल्या सच्च्या साथीच्या विरहाने कौळाणेत निधन झाले.पण…माझ्या आयुष्यात जीवाला जीव देणारे,एकमेकांसाठी सुख दुःखाला खंबीर उभे राहणारे,अडीअडचणीला मोठया हिंमतीने तोंड देणारे सच्चे प्रेमवीर म्हणून कायमस्वरुपी रंभा पंडीतची प्रेमकहाणी अजरामर राहिल.आज जरी ते या जगात नसले,तरी त्यांच्यासारख्या सच्च्या प्रेमाचा.प्रेमाचे त्याग समर्पण व बलिदानाचा सुगंध दरवळत रहो..व त्यांच्या सारखेच प्रेम कुणाचे असेलच तर ते सस्केस होवो हीच रंभा पंडीतला खरी श्रध्दांजली ठरेल!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा न्युज
संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन

Previous articleसर्वोदय वार्डातील खुले चेंबर देत आहेत मृत्यूला आमंत्रण. नगर परिषद प्रशासन झोपेचे सोंग घेऊन.
Next articleजि.प.वाशिम व पं.स.वाशिम मार्फत सुरू असलेल्या विकास कामातील भ्रष्टाचार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here