Home वाशिम जि.प.वाशिम व पं.स.वाशिम मार्फत सुरू असलेल्या विकास कामातील भ्रष्टाचार

जि.प.वाशिम व पं.स.वाशिम मार्फत सुरू असलेल्या विकास कामातील भ्रष्टाचार

40
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0021.jpg

जि.प.वाशिम व पं.स.वाशिम मार्फत सुरू असलेल्या विकास कामातील भ्रष्टाचार                                    वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

मागील दोन वर्षात अनसिंग शहरात व परिसरात जिल्हा परिषद च्या विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामाच्या दर्जा या शब्दाला लाजवेल असे दर्जा हित काम होऊन प्रचंड भ्रष्टाचार स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रा.पं. अनसिंग च्या प्रशासनाने केली आहे. या संदर्भात चौकशीहोवुन सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. यासाठी या कामाच्या दर्जाची सध्याच्या स्थितीची व लेखा परीक्षणाची अवलोकन करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन व्हावी त्यात तांत्रिक अधिकारी सोबत लेखा परीक्षकाची सुद्धा नियुक्ती करावी जेणेकरून संबंधित कत्राटदारांनी किंवा संस्थेने त्यांच्या कामाच्या कामानिहाय अंदाजपत्रकातील विविध वर्गातून वस्तूची खरेदी कुठून केली किती केली त्यांची देयके कशी दिली का आर.टी.जी.एस द्वारे नेट किंवा बँक द्वारे अशा प्रकारचे सखोल चौकशी लेखी परीक्षणाद्वारे विशेष लेखा परीक्षण केल्यास या सर्व कामात अंदाजपत्रकाच्या 50%च खर्च झाला असे निर्देशनास येईल अशी आमची खात्रीदायक मत आहे.80 टक्के समाजकारण व 2 टक्के राजकारणाचा वारसा घेऊन हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुखाच्या विचाराने चालणारे आपण वाशिम जिल्ह्याचे एका आधारस्तंभ आहात आपण बांधकाम विभाग सभापती आहात म्हणून आपले हे अधिकार आहे पण त्यापेक्षा जास्त तुम्ही जिल्हाप्रमुख असल्यामुळे आम्हाला तुमच्या कडून अपेक्षा आहे. आपण अनसिंग चे शिवभाऊ आहात त्यामुळे आपले अनसिंग वर विशेष प्रेम आहे असे गृहीत धरून आम्ही आपणाकडे न्यायाच्या अपेक्षित आहोत. येत्या सात दिवसाच्या आत चौकशीला सुरुवात न झाल्यास आम्ही सर्वप्रथम धरणे आंदोलन नंतर सत्याग्रह व शेवटी आमरण उपोषण करू पण ती वेळ आपण आमच्यावर येऊ देणार नाही यांचा विश्वास आम्हाला आहे असे निवेदन किसनसिंग ईश्वरसिंग ठाकूर, चंद्रकांत उत्तमराव ठाकरे, चिंतामण संपत डांगे, भारत महादेव लांडे, शेख बबलू शेख खाजा, विठ्ठल.मा.सातव, वैभव दत्ता सातव यांनी दिले

Previous articleआगळीवेगळी जगावेगळी प्रेमकहाणी..रंभा;पंडित!!
Next articleमातोश्री ग्रामसमृध्दी शेत पानंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी संदीपदादा बेडसे च्या पाठपुराव्याला यश,जनतेनेही मानले आभार…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here