• Home
  • *मराठा क्रांती मोर्चा घेणार ना.छगन भुजबळ यांची भेटः* *दुरावा नसल्याचा निर्वाळा*

*मराठा क्रांती मोर्चा घेणार ना.छगन भुजबळ यांची भेटः* *दुरावा नसल्याचा निर्वाळा*

*मराठा क्रांती मोर्चा घेणार ना.छगन भुजबळ यांची भेटः* *दुरावा नसल्याचा निर्वाळा*
नाशिक/ प्रतिनिधी युवराज देवरे
मराठा क्रांती मोर्चा आणि ना.छगन भुजबळ यांच्यात कुठल्याही प्रकारचा दुरावा नाही.काल शुक्रवारी भुजबळ फार्मवर व्यक्त झालेल्या संताप या केवळ उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या.हा विषय मराठा क्रांती मोर्चाकडून संपलेला आहे.येत्या एकदोन दिवसात ना.भुजबळ यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची भेट होणार असून मराठा समाजाच्या विविध मुद्यावर ना.भुजबळ यांनी राज्यासह केंद्र सरकारकडे बाजू मांडावी असा आग्रह धरणार आहेत.म्हणून यानंतर राजकीय पक्षाच्या कार्यकारीणीवर असलेल्या कुठल्याही नेत्याने मोठेपणा मिरवून मर्जी संपादन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असे आवाहन नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून ना.भुजबळ विरूध्द मराठा क्रांती मोर्चा असे चिञ जाणीवपुर्वक काही मंडळी निर्माण करीत होते.या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे जेष्ठ मार्गदर्शक सुनिल बागूल यांच्या निवासस्थानी मराठा समाजाच्या सर्व संघटनांची बैठक पार पडली.या बैठकीत ना.छगन भुजबळ यांची वेळ घेऊन चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासंदर्भात ना.भुजबळ यांच्याशीही संपर्क साधल्याचचे क्रांती मोर्चाने सांगीतले.या बैठकीला सुनील भाऊ बागुल, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, चेतन शेलार, राजेश पवार, आशिष हिरे, प्रफुल वाघ, नीलेश शेलार, शरद तुंगार, योगेश गांगुर्डे, तुषार गवळी, किशोर तिडके, शिवा गुंजाळ, नितीन बाळा निगळ, निलेश मोरे आधी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment