Home Breaking News बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका काळजी घ्या, जिल्ह्यात आणखी १०६० बेड उपलब्ध...

बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका काळजी घ्या, जिल्ह्यात आणखी १०६० बेड उपलब्ध ; मा धनंजय मुंडे

136
0

बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका काळजी घ्या, जिल्ह्यात आणखी १०६० बेड उपलब्ध ; मा धनंजय मुंडे

विशेष प्रतनिधी – राजेश एन भांगे

बीड, दि. २१; बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड विषयक सर्व सुविधा आणि उपाय योजनांचा दररोज आढावा घेत असून जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची संख्या मुबलक असून नागरिकांनी याबाबत घाबरायची गरज नाही असे श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात ऑक्सिजनची सुविधा असलेले एकूण ७७० बेड तर व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेले एकूण १२४ बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर १६६ सामान्य बेड उपलब्ध आहेत. जिल्हा आरोग्य विभागाला याबाबतची सर्व माहिती दररोज नागरिकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात यावी याबाबत सूचनाही श्री. मुंडेंनी दिलेल्या आहेत.

त्यानुसार आरोग्य विभागाकडून दररोज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या आकडेवारी सोबतच आता दररोज कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या, तसेच रुग्णालय निहाय उपलब्ध असलेल्या बेडची संख्या ‘डॅशबोर्ड’ स्वरूपात दररोज प्रसिद्धीला देण्यात येत आहे.

दरम्यान माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानास जिल्ह्यात सुरूवात होत असून नागरिकांनी रुग्णालयातील उपलब्ध बेडच्या संख्येवरून गोंधळून जाऊ नये, जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सक्षमपणे काम करत असून, बेडसह अन्य सर्व सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, तसेच आपण त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. पुढील काही दिवसात रुग्ण संख्या आणखी वाढल्यास शहरननिहाय आणखी खाजगी दवाखान्यांना कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येईल, त्याबाबतची तयारीही पूर्ण केलेली आहे, असेही ना. धनंजय मुंडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here