Home गडचिरोली गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा सौ.योगीताताई पिंपरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा!

गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्षा सौ.योगीताताई पिंपरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा!

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0026.jpg

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                         गडचिरोली नगरपरिषदेच्या लोकप्रिय माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांच्या वाढदिवसा निमित्त ८ जुलै रोजी रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण व शालेय साहित्य वितरण असे विविध कार्यक्रम आयोजित करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळ गडचिरोली यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रम:-
१)इंदिरा गांधी नगरपरिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर येथे खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन.
२)आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळ चे अध्यक्ष प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते वृक्षारोपण
3) माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन व खाऊचे वाटप
अशा विविध सामाजिक,सेवाभावी,रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबीर,वृक्षारोपण, शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, नोटबुक, पेन चे वाटप अशा विविध उपक्रमाने लोकप्रिय माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी जनसेवेचे व्रत हाती घेवुन वाढदिवस वेगवेगळ्या कार्यक्रमानी वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी खासदार अशोकजी नेते,आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष योगीताताई भांडेकर,माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, महिला आघाडी जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके,शहर अध्यक्ष कविता उरकुडे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,शहर महामंत्री विनोद देवोजवार,माजी नगरसेविका वैष्णवी नैताम,लता लाटकर, अल्का पोहनकर, रश्मी बानमारे,कोमल बारसागडे,पूनम हेमके,सातपुतेताई,वनमाला कन्नाके,युवा मोर्चा शहर महामंत्री हर्षल गेडाम, विश्वहिंदु परिषदचे नितेश खडसे, राजू शेरकी, देवाजी लाटकर, बालाजी भांडेकर, श्यामाप्रसाद वाढई,डॉ. किशोर ताराम,डॉ.मयुर चन्नावार,इंदिरा गांधी नप प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक रवी उईके,सहा.. शिक्षिका लीना कैपल्लीवार, संध्या रामने,नरेश हजारे,श्रीनिवास भुरसे,तसेच इंदिरानगर येथील नागरिक,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अनिल तिडके यांनी केले.
यावेळी १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.तसेच खासदार अशोकजी नेते यांच्यासह एक हजार नागरिकांनी बीपी,शुगर,हिवताप, तसेच साथीच्या रोगांची आरोग्य तपासणी करून घेतली.व औषधिंचे वाटप करण्यात आले

तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,उपस्थित मान्यवर व शालेय विद्यार्थी यांनी पुष्पगुच्छ देवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here