Home बुलढाणा मोफत बियाणे : ऑनलाईन नोंदणी; तरीही मिळाले नाही बियाणे

मोफत बियाणे : ऑनलाईन नोंदणी; तरीही मिळाले नाही बियाणे

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220703-WA0042.jpg

मोफत बियाणे : ऑनलाईन नोंदणी; तरीही मिळाले नाही बियाणे

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज)

संग्रामपुर:- केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे वाटप कार्यक्रम राबविण्यात येतो त्यासाठी कृषी विभागाच्या वतीने मोफत खरीप हंगामाच्या बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत जळगाव जामोद, शेगाव आणि संग्रामपूर, तालुक्यातील सुमारे 2000 शेतकऱ्यांनी महाडीबीटी वर जाऊन मोफत बियाण्यासाठी अर्ज केले मात्र अध्याप पर्यंत एकाही शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळाले नाही त्यामुळे ऑनलाईन साठी या शेतकऱ्यांनी केलेला खर्च व्यर्थ गेला आहे परिणामी कृषी विभागावर शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे तालुका कृषी विभागाच्या वतीने मोफत बियाणे साठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावे ज्या शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड होईल त्या शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे मिळेल असे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार महा डीबीटी वर जाऊन शासकीय 23 रुपये इतके शुल्क रुपये असतांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये घेण्यात आले. त्यासाठी पन्नास रुपये खर्च करून सातबारा घेऊन अर्जाला जोडावा लागला. दरम्यान महाडीबीटीची साईट जाम झाल्याने शेतकऱ्यांना सेतू सुविधा केंद्रावर चकरा माराव्या लागल्या त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढला होता. किमान एक बॅग तरी मोफत सोयाबीनचे बियाणे मिळाले तर पाच हजार रुपये वाचण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली संग्रामपूर तालुक्यातून कृषी विभागात सुमारे 1092 शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर जाऊन मोफत सोयाबीन बियाणे घेण्यासाठी अर्ज केले होते त्यापैकी 22 गावातील काही शेतकऱ्यांना निवड झाल्याचे मेसेज आले. त्यानुसार संग्रामपूर तालुक्यातील मोमीनाबाद येथील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते तथा रिंगणवाडी ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील जवंजाळ व इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या कार्यालयात स्वतः भेट घेऊन लेखी स्वरूपात अर्ज देऊन लवकरात लवकर बियाणे उपलब्ध करून देण्याची विनंती सुद्धा केली परंतु या कुंभकर्णी झोपेतील कृषी विभागाला मात्र शेतकऱ्यांची तीळ मात्र ही दया येत नाही कारण त्या शेतकऱ्यांना तुम्हाला आलेले मेसेज हे चुकीचे आहेत असे सांगून परत करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांची कृषी विभागामार्फत फसवणूक झाली असेच म्हणावे लागेल. अद्याप पर्यंत बियाणे उपलब्ध झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here