Home उतर महाराष्ट्र आदीवासी भागातील नोकरीतुन केला संसारीक जीवनदायी आदर्श ,उभारण्यास जीवनसाथीकडून मोलाची अनमोल साथ

आदीवासी भागातील नोकरीतुन केला संसारीक जीवनदायी आदर्श ,उभारण्यास जीवनसाथीकडून मोलाची अनमोल साथ

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220627-WA0019.jpg

आदीवासी भागातील नोकरीतुन केला संसारीक जीवनदायी आदर्श ,उभारण्यास जीवनसाथीकडून मोलाची अनमोल साथ

वासखेडी/साक्री दिपक जाधव – नंदुरबार या आदिवासी जिल्हयातील अक्कलकुवा तालुक्याच्या नवापाडा गावाच्या माध्यमिक शाळेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री,सुरेश सोनु शिंदे यांचा वासखेडी आपल्या जन्मभुमी त आपले बालपणात ज्यांची आजपर्यत अनमोल साथ दिली आणि आजपर्यंत मित्रता निभावली यांच्या उपस्थितीत आज रोजी सेवानिवृत्ति चा रहस्यमय सोहळा संपन्न झाला,बालपणापासुन तर आज वयाच्या 55वर्षी सलग टिकणारी खरी मैत्री हे आजचे जीवंत उदाहरण होय,आजच्या सेवानिवृत्ती सोहळ्या प्रसंगी बघावयास मिळाल्याचा मनस्वी आनंद नागरीकांना ही झाला,
सुरेश शिंदेनी आपल्या विद्यालयात परीपुर्ण सेवा देत आपला आदर्श उभा केला,संसाराची गाथा बघता मोलाची साथ देणाऱ्या आपल्या जीवनसाथीकडून संसाराचा गाडा अतिशय प्रखरपणे वाहुन नेत दोन मुली दोन मुलांचा शिक्षणाच्या प्रवाहात वाहुन नेण्याचा इतिहासाचं प्रतीक त्यांची धर्मपत्नी आहे,अति दुर्गम भागात आपली एकनिष्ठ सेवा श्री, शिंदे यांनी दिली,बालपणीच्या मैत्रीचा हा मनस्वी आनंद होय ,यांच्या या मित्रांसमवेत नाशिक येथील निवृत्त सहा,पोलीस उपनिरीक्षक श्री,राजेंद्र ठाकरे हेही मागील महीन्याला पोलीस दलातुन नुकतेच निवृत्त झाले,या निवृत्ती मागच्या आनंदाचं प्रसन्नपणे आयोजन करतांना मनस्वी आनंद बालपणातील सुदामा सारखे मित्रांना झाला,
प्रसंगी बोलतांना शेणपुर येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच पत्रकार पी,झेड,कुवर म्हणाले की,शिंदे आम्ही सगळेच मित्र अगदी बालपणापासुन एकत्रीत आहोत याचा मला अभिमान आहे,जि,प,शाळेत पहीली ते चौथीत आमचे मित्र आबा दहीते यांच्या मातोश्री,सिंधुताई दहीते या आईसमान गुरू म्हणुन त्यांनी घडविले,स्वभावाची आतुरता बघता ,मुलांसारखेच आम्हांवर ही प्रेम देत ,शिकवणीचा धडा दिला,त्यांच्या या कथित शिक्षणांचे हे जीवंत उदाहरण आहे, आज रोजी आमचा संसार सुखदायी करून नोकरीचे खरे शिल्पकार ,गुरू हे सिंधुताई होत,या आधारभुत आठवणीने मन भारावुन येते,यावेळेस नाशिक येथील पोलीस दलातील निवृत्त सहा,पोलीस उपनिरीक्षक श्री,राजेंद्र ठाकरे,म्हणाले की,माझ्या सगळ्या मित्रांची बालपणाची मित्रता बघता आज पर्यंतचा होणारा मित्रत्वाचा प्रवास हा एका कुटुंबासारखा सु:ख दु:खाच प्रतीक असुन आजपर्यंतचा प्रवास जसा चालत आला तसाच चालत राहो आणि सेवापुर्ती सोहळ्याचे मानकरी यांना सपत्निक पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या तसेच गावातील ग्रामविकास मंचचा सुरू असलेल्या एक वृक्ष प्रगतीचा या योजनेत मित्राच्या सेवापुर्ती च्या नावाने कार्यक्रमा प्रसंगी सुपुर्द केले,यावेळी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपक जाधव. यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांनी, नाशिकचे निवृत्त सहा,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र ठाकरे,जितेंद्र दहीते मित्र परीवाराकडुन करण्यांत आला,
समारंभ प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरीक विश्वासराव कुवर,दादाजी नेरकर,नाशिकचे निवृत्त सहा,पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र ठाकरे,कापुस संघाचे पणन अधिकारी भास्कर बाबुलाल पाटील,ग्रामविकास मंचचे ,भाईदास कुवर सर,जि,प,मुख्याध्यापक भालचंद्र दामु कुवर, शेणपुर चे मुख्याध्यापक पी,झेड,कुवर,भामेरचे डॉ, विष्णु वाघ,कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार दिपक जाधव,माजी उपसरपंच जितेंद्र शिंदे,विनायक दामु कुवर,दिपक कुवर,विलास शिंदे,इंजि,अनिल शिंदे,लक्ष्मण कुवर,राहुल सुर्यवंशी, आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रम यशस्वितेसाठी धुळ्याचे उद्योजक आबासो,जितेंद्र दहीते,माजी उपसरपंच दाजीसो,संभाजीराव कुवर,बाळाजी सुर्यवंशी, रविंद्र धुडकु साळुंखे, व आभार इंजि,अनिल सुरेश शिंदे यांनी मानले.

Previous articleहिरकणी ग्रुप कडून वारकऱ्यांना खाऊ वाटप
Next articleदिव्यांग निधी दिला तरी कधी शासनाने दिला आधार तरी वासखेडी ग्रामपंचायत आहे निराधार…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here