Home भंडारा पत्रकारावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा

36
0

आशाताई बच्छाव

IMG_20240202_180403.jpg

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा नोंद करावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
काटगाव तालुका लातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांना इन्स्पेक्शनच्या नावाखाली अनेक वेळा संडास बाथरूम साफ करुन घेतल्याचा प्रकार घडला असून सदर प्रकरण विद्यार्थ्यांच्या पालकावर दबाव आणून मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक व क्राईम रिपोर्टरचे संपादक धनराज वाघमारे गेले असता मुख्याध्यापक यांनी अरेरावीची भाषा करून गावची इज्जत बाहेर काढतोस का म्हणून मुख्याध्यापक व गावातील गावगुंडांनी पत्रकारावर प्राणघातक हल्ला केला. पत्रकार धनराज वाघमारे हे सिव्हील हॉस्पिटल लातूर येथे ॲडमिट आहेत.
सदर घटनेची तात्काळ चौकशी करून पत्रकार धनराज वाघमारे व कॅमेरामन यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या गावगुंडावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा.
पीडित मुलींकडून अनेकवेळा संडास बाथरूम साफ करून घेऊन शिक्षण विभागास काळे फासणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना तात्काळ सेवेतून निलंबित करून फौजदारी कारवाई करावी, पीडित मुलीच्या पालकास दडपशाही करत जबरदस्तीने आमची तक्रार नाही असा जाब नोंदवून घेणाऱ्या वरिष्ठ अधिकारी (बी ओ) यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक व भाग जमादार यांची तात्काळ बदली करावी, दहशत माजवणाऱ्या गावगुंडावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करावी, गावगुंडांनी दडपशाहीखाली ठेवलेल्या पालक व मुलींचे पुनर्वसन करावे.
आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर, पोलीस अधीक्षक लातूर, व सीईओ यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने देण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार शिरीषकुमार शेरखाने, कार्याध्यक्ष रियाज शेख, ॲड. राजकुमार दाभाडे, संपादक दिनेश गिरी, आनंद दनके, लिंबराज पन्हाळकर, अमोल इंगळे, साईनाथ घोणे, अमोल घायाळ, नेताजी जाधव, कृष्णा कोल्हापुरे, नरसिंगे व्यंकटेश, अहिल्या कस्पटे, विजय गायकवाड, कावेरी विभुते आदींच्या सह्या आहेत.

Previous articleभविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत सोलर पँनल बसविण्याचा प्रयत्न – आ. कानडे
Next articleस्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर तर्फे NEP 2020 स्कुल कनेक्ट अभियान कार्यशाळा संपन्न-
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here