आशाताई बच्छाव
बुलेटच्या कर्ण कर्कश्श आवाजा विरुध्द वाहतूक पोलीस यंत्रणेची मोहिम सुरू
शत्रुघ्न काकडे पाटील :-बुरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)
परभणी :-परभणी शहर वाहतूक पोलिस यंत्रणेने कर्णकर्कश्श्य आवाज करीत धावणाऱ्या बुलेट विरोधात जोरदार मोहिम सुरु केली आहे.शहर वाहतूक पोलिस यंत्रणांनी बुधवारी (दि. 22) रस्त्यावरुन कर्णकर्कश्श्य आवाज करीत धावणाऱ्या बुलेट विरोधात मोठी मोहीम सुरु केली. जवळपास 24 वाहने जप्त केली. तर अनेक वाहनांविरोधात दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या या मोहिमेने बुलेटधारक अक्षरशः चक्रावून गेले. वसमत रोड, अपना कॉर्नर, जिंतूर रोड वगैरे भागात ही मोहिम राबविण्यात आली. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय इंगेवाड, उपनिरीक्षक मकसूद पठाण, कर्मचारी लहाने, जुक्टे, पवार, लोखंडे, भराडे, वाव्हळे, शेख मुश्ताख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या सायलेंसरमध्ये कर्णकर्कश्श्य आवाजात बुलेट पळविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत