Home बुलढाणा जळगाव जामोद कृषी अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक…..

जळगाव जामोद कृषी अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक…..

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0053.jpg

जळगाव जामोद कृषी अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक…..

ज्ञानेश्वर पाटील दांदळे
युवा मराठा न्यूज विशेष प्रतिनिधी

महा Dbt अंतर्गत ऑनलाईन केलेल्या शेतकऱ्यांना बी-बियाणे-खते उपलब्ध करून द्या.

जळगाव जामोद :- गरीब,गरजू शेतकऱ्यांना मोला माहगाईचे बी-बियाणे-खते घेणे परवडत नसल्याने शासन स्तरावर महाडीबीटी या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले अशा शेतकऱ्यांना काही टक्के अनुदानावर सरकार शेतकऱ्यांना सोयाबीन,उडीद,मूग इतर बियाणे व खते उपलब्ध करून देतात.
हे बी-बियाणे मिळावे यासाठी २०२२ या वर्षाला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी महा डीबीटी अंतर्गत ऑनलाइन अर्ज केले होते.
परंतु पेरणीचे दिवस आले असतांना सुद्धा कृषी विभागाकडून मात्र बि-बियांनाचा कोठा हा तालुक्याला कमी असल्याचे सांगत काहीच शेतकऱ्यांनाच सोयाबीन व इतर बि देत अल्याचे दिसून येते. तर अनेक शेतकऱ्यांना महाडीबीटी पासपोर्ट अंतर्गत पाठवण्यात आलेले मेसेज असून सुद्धा कोणत्याच प्रकारचे सोयाबीन व बियाणे कोठा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवत बियाणे देत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे ज्या गरीब शेतकर्‍यांनी ऑनलाइन अनुदान स्वरूपात बी-बियाणे व खतांची मागणी केली आहे. अशा शेतकऱ्यांना मोला महागाईचे बियाणे कृषी सेवा केंद्र वरून नाईलाजास्तव विकत घ्यावे लागतात.ह्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतआहे.त्यामुळे या शेतकऱ्यांच्या मागणीला कृषी विभाग विचारात घेईल का? हा सुद्धा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडलेला आहे. बियाणे महामंडळनी/कृषी विभागाने शेतकऱ्यांना बियाणे-खते देण्यासाठी कोठा उपलब्ध नाही. सांगत असल्याने शेतकरी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी जळगाव जामोद तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी महा डीबीटी अंतर्गत ऑनलाइन बी बियाणे करता अर्ज केलेले आहेत शेतकऱ्यांना बी-बियाणे-खाते उपलब्ध करावे याकरता शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय गाठत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी युवा आंदोलक अक्षयभाऊ पाटील, दिपक म्हसाळ, अजय गिरी, तुकाराम पाटील, अश्पाक देशमुख, पवनसिंग सोमवंशी, अवी पाटील मोहन वंडाळे तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous articleश्री गुरूग्रंथसाहिब भवन येथे भव्य प्रमाणात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा
Next articleमल्हार हिल कॅम्पसमध्ये योगदिन साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here