आशाताई बच्छाव
कसमादे परिसरात पावसाअभावी सर्वत्र चिंतातूर वातावरण !सुसाट वा-यामुळे पेरण्या खोळंबल्या!
(आशाताई बच्छाव युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव-मालेगांव तालुक्यासह संपूर्ण कसमादे पट्ट्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत दोन वर्षात चांगला पावसाळा झाला; मात्र यावर्षी आज पावसाळा सुरुवात होऊन पंधरा दिवसाचा कालावधी उलटूनही पावसाचा अद्याप थांगपता नसल्याने शेतकरी वर्ग चिंताक्रांत झाला आहे.सुरुवातीला अगदी अल्पसा पाऊ झाला तर काही ठिकाणी जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पाऊस येईल या भरवश्यावर पेरण्या केल्या मात्र सर्वत्र सुटलेल्या सुसाट हवेमुळे वातावरणात ढग जमा होऊन पाऊस येण्याची चिन्हे दिसत नसल्याने आणि केलेली पेरणी वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यापुढे आ वासून उभे ठाकले आहे.तर शेतकरी आकाशकडे टक लावून पावसाची केविलवाण्या व आशाळभूत नजरेने टक लावून पाहणी करीत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र बघावयास मिळत आहे.