आशाताई बच्छाव
कळवणच्या सुळे गावात रेशन दुकानदाराकडुन ग्राहकाला मारहाण करून सुद्धा दुकानदारावर अद्याप कार्यवाही नाही! कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- कळवणचे तहसीलदार साहेब बी. ए. कापसे यांना निवेदन देऊन जवळ जवळ एक दीड महीने झाले अद्याप कार्यवाही नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांना पण निवेदन देऊन सुद्धा कार्यवाही नाही. निवेदन देताना कृष्णा गवळी,कांतीलाल गांगुर्ड,धोंडीराम गांगुर्ड,ताराचंद गावित,जीवा गांगुर्ड,प्रविण गांगुर्ड,किरण बागुल,राहुल बागुल,व समाधान गांगुर्ड.आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सुळे गावातील दुकान क्रमांक ८८ दुकानदार श्री पोपट मोतीराम बागुल यांचे अधिपत्याखालील असुन सदरील दुकानदार हे कमी जास्त प्रमाणात धान्य वितरण करतात. वेळेवर रेशन देत नाही,बिल पावती पण देत नाही मोफत धान्य वेळेवर देत नाही. सुळे गावातील ग्रामस्थ कृष्णा जेजीराम गवळी यांनी दुकानदार पोपट बागुल यांना विचारले की अंत्योदय कार्ड धारकाला किती रेशन दिले जाते.तसेच प्रत्येक कार्ड धारकाला ५ किलो धान्य कमी देतो?. का कमी देता ?असे विचारले असता. वरूनच आम्हाला प्रत्येक कट्टा मध्ये ३/४ किलो धान्य कमी येते म्हणून आम्ही कमी देतो.अशी विचारणा केली असता दुकानदार पोपट बागुल यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली तरी अद्याप दुकानदारावर कार्यवाही नाही.तहसीलदार साहेबांना सुळे ग्रामस्थांनी निवेदनातून एकच विनंती केली आहे की सुळे गावातील रेशन दुकानदार पोपट बागुल दुकान क्रमांक ८८ यांचा रेशन धान्य परवाना कायम स्वरुपी रद्द करण्यात यावा.अशी मागणी सुळे गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. जर या दुकानदारावर कार्यवाही न झाल्यास सुळे गावातील ग्रामस्थ आमरण उपोषण करण्यात येइल असा इशारा सुळे गावातील ग्रामस्थांनी दिला.