Home वाशिम आमखेडा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

आमखेडा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220608-WA0040.jpg

आमखेडा येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा       वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

गीताई ह्युमनकाइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कर्मयोगी बाबाराव जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा अंतर्गत आमखेडा येथे जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी साजरा करण्यात आला. ग्रामीण कृषी जागृकता व कृषी औद्योगिक कार्यक्रमांतर्गत आमखेडा कृषी दूध शुभम बाबाराव वाकुडकर, चैतन रामकिसन वाकुडकर यांनी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मार्गदर्शन, ग्रामस्वच्छता व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सभेला गावाचे सरपंच विठ्ठल जोगदंड व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना पर्यावरणाचा महत्त्व, तसेच रासायनिक खताचा वापर कमीत कमी करून जैविक शेतीचा वापर करण्याचा सल्ला व फायदे सांगितले.या कार्यक्रमा साठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.जाधव प्रा. प्रदीप निचळ,कार्यक्रम समन्वयक डॉ.रवी करंजगामी व प्रा.अंकुश वाठोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कृषी महाविद्यालय आमखेडा यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विविध प्रयोग उपक्रम राबविले जातात‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here