• Home
  • सिमकार्ड बंद झाल्याने बेरोजगार ग्रामिण व शहरी कामगार यांचा संपर्क तुटला

सिमकार्ड बंद झाल्याने बेरोजगार ग्रामिण व शहरी कामगार यांचा संपर्क तुटला

*सिमकार्ड बंद झाल्याने बेरोजगार ग्रामिण व शहरी कामगार यांचा संपर्क तुटला*
नाशिक (नितीन आतकर पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-मोबाईल नेटवर्क सेवा देणाऱ्या कंपन्यांचे डोके ठिकाणावर आहे काय,असाच सवाल ग्रामिण शेतकरी,शेतमजुर, व बेरोजगार करत आहे.
ग्रामिण भागातील असंख्य कुटुंबे रोजगाराच्या आशेने गाव सोडून इतर राज्यात व जिल्ह्यात विखुरलेले आहे. साधारणता 10 वर्षांपूर्वी मोबाईल सिम नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांनी 999 रु घेऊन लाईफटाईम फ्री इनकमिंग सुविधा दिली होती.आता त्यांनी ती सेवा बंद करून टाकली.
जास्तीत जास्त फोन सेवा बंद असलेले लोक हे ग्रामिण भागातील लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहे शेतकरीही हवालदिल झाले आहेत अशातच घरखर्चाचाही भार पेलवत नसल्याने सिम रिचार्ज करू शकत नाही.परिणामी दुसऱ्या महिन्यात मोबाईल फोन बंद होऊन संपर्क तुटतो काही दिवसांनी सिम नंबर देखील बंद होतो.यामुळे असंख्य ग्रामिण लोकांचे ऐन शेतीच्या कामांच्या दिवसांत फोन बंद होत आहे.
सरकारने मोबाईल सिम नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांना सिम बंद करू नये अशी विनंती करावी अशी मागणी होत आहे.

anews Banner

Leave A Comment