Home बुलढाणा ग्रामसेवकाला तीन दिवसांचा अल्टिमेटम

ग्रामसेवकाला तीन दिवसांचा अल्टिमेटम

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0013.jpg

. ग्रामसेवकाला तीन दिवसांचा अल्टिमेटम
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रस्ताव करून आदिवासी रद्द ग्रामसेवकाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. संग्रामपूर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाला तीन दिवसांच्या आत पंचायत समितीत कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आदिवासी लाभार्थ्याला वंचित ठेवणे चिचारी येथील मिरण वजीर केदार या लाभार्थ्याचे नाव शबरी घरकूल योजनेच्या प्रतीक्षा यादीमध्ये ३१ क्रमांकावर तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र ‘ड’ च्या यादीत १३ क्रमांकावर आहे. लाभार्थ्याने ग्रामपंचायतकडे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करीत प्रस्ताव सादर केला. ग्रामपंचायतकडून पंचायत समितीकडे घरकुलाचा प्रस्ताव सादर घरकुलापासून होऊन बांधकामासाठी पहिला हप्ता मिळणे अपेक्षित होता. मात्र लाडणापूर येथील ग्रामसेवकाने नियम बाह्यपद्धतीने प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रस्ताव रद्द केला. या लाभार्थ्याचे नाव शबरी आवास योजनेच्या यादीत असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेतून वगळण्यात आल्याचे कारण नमूद करीत ग्रामसेवकाने प्रस्ताव रद्द केला. यासंदर्भात अकोला येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी गटविकास अधिकारी संग्रामपूर व ग्रामसेवक लाडणापूर यांना एका पत्रकाद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ देणे बाबत बजावले होते. मात्र ग्रामसेवकाने आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याच्या पत्राला केराची टोपली दाखवत घरकुलाचा लाभ देण्यासंदर्भात नकार दिला. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी लाडणापूर येथील ग्रामसेवकाला शबरी तसेच प्रधानमंत्री आवास योजने संदर्भातील याद्यांसह लाभार्थ्याचे मूळ दस्तावेज घेऊन तीन दिवसात पंचायत समितीत हजर राहण्याचे आदेश दिले आहे. घरकूल योजनेतील वंचित आदिवासी लाभार्थी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here