Home गडचिरोली 1 लाख रुपयाची लाच स्विकारतांना वनपाल एसिपीच्या जाळ्यात।

1 लाख रुपयाची लाच स्विकारतांना वनपाल एसिपीच्या जाळ्यात।

65
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220604-WA0017.jpg

1 लाख रुपयाची लाच स्विकारतांना वनपाल एसिपीच्या जाळ्यात।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): शेतातील कंटिग केलेले सागवान वाहतुक करण्याकरिता लागणारा निर्गत परवाना (TP) देण्याच्या कामाकरिता 1 लाख रुपयाची लाच रक्कम स्विकारतांना सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या उपक्षेञ पाथरी येथिल वनपाल वासुदेव लहानू कोडापे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.सदर कारवाईमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.सदर कारवाई काल 3 जून रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार,तक्रारदार यांनी गावातील शेतकरी यांच्या शेतातील कंटिग केलेले सागवान लाकूड वाहतुक करण्याकरीता लागणारा ठेकेदारीकरीता निर्गत परवाना (TP) देण्याच्या कामाकरीता उपक्षेञ पाथरी येथिल वनपाल कोडाप यांच्याकडे मागणी केली.वनपाल यांनी निर्गत परवाना देण्याच्या कामाकरीता 1 लाख 2 हजार रुपयांच्या लाच रकमेची मागणी करुन तळजोडीअंती 1 लाख रुपयाची लाच स्व:ता स्विकारल्याने त्यांच्या शासकिय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सदर कार्यवाही पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक लाप्रवि नागपुरचे राकेश ओला,अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गीते,तसेच उपअधिक्षक लाप्रवि चंद्रपुर अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शिल्पा भरडे,तसेच कार्यालयीन स्टॉप सफौ रमेश दुपारे , नापोकॉ नरेश नन्नावरे,पो.अ रविकुमार ढेंगळे,वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम यांनी केली.

कोणतीही लाचखोरी अधिकारी, कर्मचारी किंव्हा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करित असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleअखेर आधारभूत धान खरेदी उद्धीष्टात वाढ. आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश.
Next articleस्वा.रा.ति.म. विद्यापीठाची पि.एच.डी. पदवी शेख यास्मिन असगरसाब यांना प्रदान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here