Home नांदेड स्वा.रा.ति.म. विद्यापीठाची पि.एच.डी. पदवी शेख यास्मिन असगरसाब यांना प्रदान.

स्वा.रा.ति.म. विद्यापीठाची पि.एच.डी. पदवी शेख यास्मिन असगरसाब यांना प्रदान.

69
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220604-WA0022.jpg

स्वा.रा.ति.म. विद्यापीठाची पि.एच.डी. पदवी शेख यास्मिन असगरसाब यांना प्रदान.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे २४ वा दिक्षांत समारंभ दि. १ जून रोजी संपन्न झाला. या समारंभात शेख यास्मिन असगरसाब यांना विद्यापीठाची प्राणीशास्त्र या विषयात कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांच्या हस्ते पि.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
दिक्षांत समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कूलपती भगतसिंग कोशारी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे आॅनलाईन तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शेखर मांडे (मा. सचिव वैज्ञानिक आणि औद्योगीक संशोधन विभाग, दिल्ली), विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या हस्ते दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. तसेच त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“Periphyton system of some selected substrates and their application for culture of Indian Major Carp?’ या विषयावर यास्मीन शेख यांनी शोध प्रबंध सादर केला आहे. त्यांना स्कूल ऑफ लाईफ सायन्स येथील विभाग प्रमुख डॉ. शिवाजी पि. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. यास्मिन शेख ह्या स्वा.रा.ति.म. विद्यापीठ येथे प्राध्यापिका (तासीका तत्वावर ) म्हणून नियुक्त आहेत. यास्मिन यांचे पदवी (बी.एस्सी.) शिक्षण अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातून पुर्ण झाले आहे. पदवोत्तर (एम.एस.सी.) शिक्षण स्वा.रा.ति.म. विद्यापीठ येथून उच्च गुणासह पुर्ण केले आहे. त्यांना विद्यापीठाचा सुवर्ण पदक प्राप्त आहे. शेख यास्मीन यांचे वडील शेख असगरसाब हे घडी मेकॅनिक असून छोट्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करतात. वडीलांच्या परिश्रमाची जाणिव ठेवत हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेऊन आज उच्चशिक्षित झाल्या आहेत.
यावेळी यास्मीन शेख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन (मा.प्र. कुलगुरू स्वा.रा.ति.म. विद्यापीठ, नांदेड) व तसेच मार्गदर्शक एस.पी. चव्हाण (विभाग प्रमुख लाईफ सायन्स), डॉ. ग्याननाथ सर, प्रा. कदम सर, प्रा. भोसले मॅडम, प्रा.कांबळे सर, प्रा. आर. मुलानी (विभाग प्रमुख डिस्टन्स ऐजुकेशन ), महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्रा. कदम सर, प्रा. देसाई सर, सौ.प्रा. शिंदे मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्यांच बरोबर पठाण सर, ख्याजा सर, डॉ. सय्यद इलीयास (पुणा कॉलज पुणे), डॉ. पाटील सर (सान्यस कॉलज नांदेड) प्रा. सौ. शिंदे मॅडम (महात्मा फुले), प्रा. पठाण सर ( पठाण कोचिंग क्लासेस अहमदपुर ), रफिक मुंजावार सर ( महात्मा फुले विद्यालय) पोलिस उपनिरीक्षक शेख असद तसेच पालक आणि मित्र वर्ग यांचा वेळोवेळी लाभलेल्या सहकार्यासाठी आभार मानले.

Previous article1 लाख रुपयाची लाच स्विकारतांना वनपाल एसिपीच्या जाळ्यात।
Next articleग्रामीण भागात लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळणे अवघड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here