Home परभणी शेतकऱ्याकडून लाच घेणारा महावितरणचा कनिष्ठ अभियंता जाळ्यात परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची...

शेतकऱ्याकडून लाच घेणारा महावितरणचा कनिष्ठ अभियंता जाळ्यात परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20220603-WA0033.jpg

शेतकऱ्याकडून लाच घेणारा महावितरणचा कनिष्ठ अभियंता जाळ्यात परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

युवा मराठा न्युज नेटवर्क
ब्युरो चीफ:-शत्रुघ्न काकडे पाटील

परभणी :- विद्युत जोडणी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंती २ हजार रुपये स्विकारणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. गुरुवार २ जून रोजी सदर कारवाई करण्यात आली.संतोष गंगाराम गुंजीटे, कनिष्ठ अभियंता ग्रामीण महावितरण कार्यालय शाखा – २ पूर्णा असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदाराने परमणी येथील कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या भावाच्या शेतामध्ये सौर ऊर्जा पंप मंजूर झाल्याने हा पंप शेतामध्ये बसविण्यासाठी महावितरण कार्यालयाकडून शेतात विद्युत जोडणी नसल्याबाबत प्रमाणपत्र आवश्यक असते. सदरचे प्रमाणपत्र देण्यासाठी संतोष गुंजीटे यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २ हजार रुपये देण्याचे ठरले. गुरुवार २ जून रोजी पंचासमक्ष संतोष गुंजींटे यांनी रक्कम स्विकारली. लाचखोर कनिष्ठ अभियंत्यावर सापळा यशस्वी करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक किरण बीडवे, पोलिस निरीक्षक सदानंद वाघमारे, बसवेश्वर जकीकोरे, पोलिस कर्मचारी निलपत्रेवार, कटारे, कदम यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here