Home अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका या आरक्षणामुळे 25 हून...

महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका या आरक्षणामुळे 25 हून अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार आहे.

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0026.jpg

महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण जाहीर, नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका
या आरक्षणामुळे 25 हून अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार आहे.
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अकोला महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण (Akola Election Reservation 2022) आज जाहीर झालं. आजच्या नव्या आरक्षणामूळे दिग्गजांना फटका बसला असून अकोल्याचे भाजप उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षित निश्चित झाले. तर भाजपचे सभागृह नेते राहूल देशमुखांचा प्रभाग महिलेसाठी राखीव झाले. या आरक्षणामूळे २५ वर विद्यमान नगरसेवकांना निवडणूकक रिंगणाबाहेर राहावे लागणार आहे. अकोला महापालिकेत एकू़ण ९१ जागा असून एकूण ४६ जागा महिलांसाठी राखीव आहे. तर १५ जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव आहे.

या आरक्षणामुळे 25 हून अधिक विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर राहावं लागणार आहे. अकोला महापालिकेत एकू़ण 91 जागा असून एकूण 46 जागा महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 15 जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

दरम्यान, उच्च न्यायालयाने इतर मागास वर्गाचे आरक्षण नाकारल्याने एकूण ७४ जागांवर खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. एकुण ९१ जागांमधील ४६ जागा महिला प्रवर्गाकरिता आरक्षित करतांना ८ जागा अनुसुचित जाती महिला आणि एक जागा अनुसूचित जमाती महिलासाठी जाहिर झाली. तर उर्वरित ३७ जागा सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी जाहिर झाल्या. दरम्यांन, महापालिकेच्या एकूण ३० प्रभागातून ९१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. २९ प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.

*अनुसुचित जाती माहिलांसाठी आरक्षित जागा*
अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकूण १५ प्रभागातील अनुसुचित उमेदवाराकरीता आज चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत जाहिर झालं. यामध्ये सात जागा अनुसूचित जाती महिला राखीव झाले. ज्यात ३-अ, ६-अ, ९-अ, १०-अ, १२-अ, १८-अ, १९-अ, आणि २३-अ जागा आहे.

*अनुसूचित जमातीसाठी ‘२४-अ’ हि जागा महिला राखीव करण्यात आलीय*

*सर्वसाधारण महिलांसाठी असे आहेत आरक्षित जागा*
सर्वसाधारण महिलांसाठी ३७ जागा राखीव झाल्या. ज्यामध्ये १-अ, ५-अ, ७-अ, ८-अ, ११-अ, १३-अ, १५-अ, १६-अ, १७-अ, २१-अ, २२-अ, २६-अ, २८-अ, तर ‘ब’ जागांसाठी २-ब, ३-ब, ४-ब, ६-ब, ९-ब, १०-ब, १२-ब, १४-ब, १८-ब, १९-ब, २०-ब, २३-ब, २४-ब, २५-ब, २७-ब, २९-ब, ३०-ब या ३० जागा आरक्षित झाल्या होत्या.

तर उर्वरित ७ जागा ‘ज्या’ प्रभागात २ जागा अनारक्षित आहे. त्या प्रभागातून चिठ्ठया टाकून आरक्षित केल्या आहे. ज्यामध्ये १-ब, ५-ब, ८-ब, १५-ब, १७-ब, २६-ब, २८-ब हे जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. असे एकत्रित ३७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले.

Previous articleशेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी करतांना काळजी घ्यावी
Next articleशेतकऱ्याकडून लाच घेणारा महावितरणचा कनिष्ठ अभियंता जाळ्यात परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here