• Home
  • ⭕ कर्तव्यदक्ष पो.नि.सुरेश कदम यांनी केली वयोवृद्धची मदत! ⭕

⭕ कर्तव्यदक्ष पो.नि.सुरेश कदम यांनी केली वयोवृद्धची मदत! ⭕


रत्नागिरी :(विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

रत्नागिरी :- तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या उक्षीतुन मुबंईतुन आलेले वयस्कर श्री. गोणभरे हे काही कामा निमित्त मुंबईतुन आपल्या उक्षी या गावी आले होते.पण लोक डाउनच्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईला परत जाता आले नाही. दोन्ही नवरा बायको वयोवृद्धच. घरात दुसरे कोण नाही.वय जास्त आल्याने त्यांचे जगणे औषधावरच. मुबंईतुन आल्यावर त्यांनी आणलेली औषधे संपली आता नेमके करायचे काय हा वयस्कर नवरा बायकोला प्रश्न पडला. त्यांच्या घरा समोरच उक्षी चेक पोस्ट असल्याने त्यांनी तिकडे संपर्क करत थेट ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांचा नंबर घेऊन त्यांना संपर्क आपली औषधे संपल्याची माहिती दिली.
कर्तव्यदक्ष अधिकार म्हणून ओळख असणारे पो. नि. सुरेश कदम यांनी गोणभरे यांची अडचण समजून घेऊन औषधांची नावे लिहून घेतली. वेळ न घालवता आपल्या कर्मचारीला पैसे देवून ती औषधे आणायला सांगितली आणि ती औषधे घेऊन स्वतः पो. नि. सुरेश कदम त्या आजोबांसाठी औषधे घेऊन उक्षीत पोचले.

anews Banner

Leave A Comment