• Home
  • मालेगांवात मंडप संघटनेच्या वतीने दिले नायब तहसीलदारांना निवेदन

मालेगांवात मंडप संघटनेच्या वतीने दिले नायब तहसीलदारांना निवेदन

*मालेगांवात मंडप संघटनेच्या वतीने दिले नायब तहसीलदारांना निवेदन*
मालेगांव,(सुनील मिस्तरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर मालेगांव शहरासह ग्रामीण भागातील सगळ्या मंडप व्यावसायिकावर संकट कोसळलेले असून,त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.मंडप व्यावसायिकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी,अशा आशयाचे निवेदन आज मालेगाव तालुका मंडप व्यावसायिक संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार खैरे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,कोरोनाच्या आलेल्या संकटामुळे या वर्षोचा लग्नसराई हंगाम,व इतरही कार्यक्रमांना मंडप व्यावसायिकांना मुकावे लागले आहे.त्याशिवाय लाँकडाऊन उघडल्यावरही लगेचच मंडप व्यावसायिकांना उद्योग व रोजगार मिळणार नसल्यामुळे शासनाने या सगळ्या बाबींचा गांभिर्याने विचार करुन मंडप व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या सहाय्य करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.हे निवेदन दाखल करण्यासाठी मंडप संघटनेचे पदाधिकारी दादा पाटील न्यु हरी ओम मंडप,संजय महाले पाटील पुजा टेन्ट हाऊस,प्रताप भावसार मनिषा टेन्ट,अमीत शर्मा जयश्री टेन्ट,संजय बोरा महावीर टेन्ट,राकेश अहिरे एकवीरा मंडप नगाव,रतीलाल सुर्यंवंशी विश्वकर्मा मंडप,उमाकांत भावसार भावसार मंडप,कैलास शर्मा भगवती मंडप आदीसह शहर तालुक्यातून बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment