Home नाशिक वडगाव शिवारात अनोळखी मृतदेह आढळला;वडनेर पोलिसांचे आवाहन

वडगाव शिवारात अनोळखी मृतदेह आढळला;वडनेर पोलिसांचे आवाहन

81
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220527-WA0030.jpg

वडगाव शिवारात अनोळखी मृतदेह
आढळला;वडनेर पोलिसांचे आवाहन
मालेगांव-तालुक्यातील वडगाव गावच्या शिवारात भिलाशेठ अस्मर यांच्या विहीरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती वडनेर पोलिसांना वडगावचे पोलिस पाटील खुशालचंद वामन शिंदे यांनी कळविल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यावर मयताच्या उजव्या हाताच्या पंज्याजवळ ओम असे चिन्ह असून,दंडावर कवटी व खंजीर गोंदलेले आहे.उजव्या बाजूस छातीवर बदामाचे चिन्ह व एस.जी.असे गोंदलेले आहे.मयताच्या दोन्ही कानात काळ्या रंगाच्या बाळ्या असून,डाव्या हाताच्या दंडावर निळ्या रंगाच्या प्लास्टिक मण्याची माळ आहे तर कंबरेस निळे रंगाची अंडरपँन्ट आहे.व निळ्या रंगाची जिन्स पँन्ट आहे.
या अज्ञात मृतदेहाबाबत कुणाला काही माहिती असल्यास वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनशी पुढील क्रमांकावर संपर्क 8468887115/9325717475 साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय आर पवार यांनी केले आहे.

Previous articleघोटाळ्याप्रकरणी पुण्यातील या प्रसिद्ध उद्योगपतीला झाली अटक
Next articleप्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी 86 महसूल मंडळातील शंभर गावांमध्ये होणार पीक कर्ज वाटप शिबीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here