Home उतर महाराष्ट्र “साक्री ची शान पांझरा कान” संकल्पनेचा होणार बहुमान,संघटीत व्हा,पांझराला परत साथ द्या….

“साक्री ची शान पांझरा कान” संकल्पनेचा होणार बहुमान,संघटीत व्हा,पांझराला परत साथ द्या….

156
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220525-WA0017.jpg

“साक्री ची शान पांझरा कान” संकल्पनेचा होणार बहुमान,संघटीत व्हा,पांझराला परत साथ द्या….

वासखेडी – (दीपक जाधव) साक्रीचा अभिमान प्रकल्प , पांझरा कान सहकारी साखर कारखाना व शासकीय दुधाचा प्रकल्प होय,हे दोन्ही प्रकल्प तालुक्याची शान होती,काही कारणे वगळता ही प्रकल्प कित्येक वर्षांपासून बंद पडलेली असुन ते नव्याने चालु झाल्यास बेरोजगारी वर आळा बसेल,व पांझरा सुरू करावा हीच या जनतेच्या अपेक्षाकृत भावना बघावयास मिळतात,ह्या तालुक्यात,अनेक,राजकीय,आदरणीय, मंत्री महोदय, आमदार,खासदार,आलेत,गेलेत,मात्र कोणीही बंद पडलेला पांझराचा विचार केला,नाही,?असे,का?हाच प्रश्न जनतेकडुन होतोय,कोणीही,आवाज उठवायला तयार नाही ,मग कोणतीही समिकरणे समोर आली नाहीत,तर विकासाची समीकरणे का समोर दिसतील,ज्यांनी प्रयत्न केली त्यांना प्रतिसादात यश आले नाही,मग विकास होईलच कसा,विचारांनी विकास होतो हेच सत्य आहे,सगळ्यांनी विचारांशी सहमत राहुन पुढील येणाऱ्या पिढीचा विचार केला तर पांझरा नक्किच सुरू होईल यात काहीच शंका येत नाही,या विचारांनी सर्वपक्षीय बैठका,मेळाव्यांचे नियोजन करत मेळावे,बैठका सूरू होवुन ,जनतेचा पाझंरासाठी चा कौल आशावादी दिसायलाही लागला,शेतकरी राजा ही खुश होत माझा पांझरा कान सुरू होईल आणि आम्ही परत एकदा सुखाच्या मार्गांवर चालु अशी ,भावनिक चर्चा परीसरात वावरू लागली,वादविवादाने कोणतेही समीकरणे सुटत नसुन,आपण दुरावत जातो,समोरासमोर बसुन निर्णय घेतल्यास तेच सगळ्यां साठी लाभदायक ठरेल, सर्व पक्षसहीत,कामगार संघटना,पत्रकार, शेतकरी बांधव,यांना अमंत्रित करून आपसातले मतभेद विसरत, आप,आपले विचार ,मत,मांडायला वेळ द्या,त्या विचारातुन जो काहीसा मार्ग निघेल,तोच पांझरासाठी अनुकुलता दाखवत लाभदायक पाया ठरेल ,वेगवेगळ्या विचारांनी चांगल्या विचारातुन वाटचालीस चांगली सुरूवात देखील होते,जितके चांगले विचार तितके मोठे बळ,त्यास ऐकीचे बळ म्हणतात ,चांगले विचार करा,एकत्रित व्हा,स़घटन करा,असे न केल्यास काहीही होवु शकत नाही,जर,शिरपुरचे कार्यसम्राट अमरीशभाईंच्या कार्याचे उदाहरण बघितले तर ,शिरपुर शहराचा कायापालट, झाला तो कौतुकास्पद म्हणावा लागेल,त्या ठिकाणी,मोठे प्रकल्प,शैक्षणिक संकुले,गुणवत्ता प्रधान शिक्षण,तेथील जनतेचा कौल बघता बेरोजगारांना रोजगार देणारे आमची शान हेच आमचे दैवत होय,कमी वेळात मोठा विकास होणारे शिरपुर शहर हे एक नाव होय,हे चित्र समोर ठेवत विचार केला तर पांझरा नक्कीच सुरू झाल्याशिवाय राहणार नाही, साक्री शहरातील,कोणतीही प्रगती बघावयास मिळत नाही,ग्रामिण रूग्णालये बघता अपुर्ण सोई नुसार आहेत, उच्च शिक्षणांसाठी मुलांना बाहेरच जाव लागत, चांगले उद्योग नाहीत,मग या शहरात आहे तरी काय ?असा प्रश्न जनतेसमोर उभा राहतो,प्रगतीच्या वाटेवरील एक नाव पाहिले तर साक्री तालुकाही विकसित होवु शकतो,कारण इथे,जुनी मंदीरे, पर्यटनस्थळे,गड,किल्ले आहेत,सुलभ सिमारेषा देखील आहेत,पण प्रश्न एकच असाकी,विकास सम्राट कधी लाभतील हीच मोठी खंत जनतेकडुन समजते,तालुक्यापेक्षा,शहराचा विकास मोठा हे समीकरण जीवंतपणी बघावयास मिळते,जवळच असलेल्या पिंपळनेर शहर हे एक नाव असुन,जिल्हयात या शहराचा उल्लेख मोठ्या प्रमाणात होतांना दिसु लागतो,तसे बघतांना साक्री तालुक्याचे ठिकाण असुन इथे,कुठलेही,उद्योग,व्यापार , उच्च शैक्षणिक क्षेत्र विकसित नाही,अथवा जगण्याचे योग्य साधन नाही ,मग इथे आहे तरी काय हाच मोठा प्रश्न उद्भवतो,जर पांझरा कान सुरू झाला तर बेरोजगारी वर मात होईल आणि माझ्या तालुक्याचे नाव होईल,आपण लढुया सत्यासाठी,आपल्या पांझराच्या हितासाठी,आणि बेरोजगारीच्या न्याय हक्कांसाठी, एकत्रीत या संघटीत व्हा,पांझरा हीच आपली शान साक्रीचा विकास हाच पांझराचा ध्यास ,सुसक्षित बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असतांना त्यांचे रोजगारीचे साधन सुरू झाल्यास कितेक संसार अंधारातुन उजेडात येतील हेच सत्य , ज्या बंद पडलेल्या पांझरासाठी नापिक झालेली जमीन सुपिक होईल ,कारखाना सुरू झाल्यास आमचे भाग्य बदलेल हीच अपेक्षा शेतकरी राजा करतोय,ज्याच्या ऊसांवर या कारखान्याची चाक आहेत तो बळीराजा खुप मोठ्या संकटात दिसत होता,तो आज पांझराच्या सुरू होणाऱ्या सुखद बातमीने परत दारिद्रया तुन बाहेर येईल आणि भावी पिढी सुखी दिसेल,नाहीतर दारिद्रयाच्या विळख्यातून या जनतेस कोणीही वाचवु शकत नाही हे त्रिकाल सत्य समोर आहे,पांझरा सुरू झाल्यास जनता संकटमुक्त होईल,एकत्रीत येवुन आपल्या पांझरास उजाळा द्यावा,आपली मातीची शान ,आपल्या विकासाचे समीकरण जवळ ठेवा,विकासास चालना ध्या,एकत्रीत या संघटन करा,पुढील वाटचालीस लाभदायी प्रेरणा ध्या,आणि पांझरा एकतेच्या ताकदीवर सुरू करा हीच जनतेची अपेक्षाकृत भावना होय,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here