Home गडचिरोली केवळ आर्थिक स्वार्थासाठी गडचिरोलीचे मेडिकल कॉलेज रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र...

केवळ आर्थिक स्वार्थासाठी गडचिरोलीचे मेडिकल कॉलेज रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध आमदार डॉ देवरावजी होळी

68
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220525-WA0001.jpg

केवळ आर्थिक स्वार्थासाठी गडचिरोलीचे मेडिकल कॉलेज रद्द करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध

आमदार डॉ देवरावजी होळी

मेडिकल कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न म्हणजे हॉस्पिटल च्या नावावर पैसे खाण्याचा डाव असल्याचा आरोप

कॉलेज रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या अन्यथा मोठे आंदोलन करणार

गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचा फार मोठा विश्वासघात

जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली येथे मंजुर करण्यात आलेले मेडीकल कॉलेज केवळ आपल्या आर्थिक स्वार्थासाठी रद्द करून राज्य सरकारने जिल्ह्यातील लोकांचा फार मोठा विश्वासघात केला असून मेडिकल कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न म्हणजे हॉस्पिटल च्या नावावर पैसे खाण्याचा मोठा डाव असल्याचा आरोप आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केला असून कॉलेज रद्द करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येण्याची गरज असून राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

मेडीकल कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी प्रशासनाने , जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हयातील जनतेला विश्वासात घेतले नाही. हा जिल्ह्यातील जनतेचा फार मोठा विश्वासघात केला आहे.

प्रथमतः जिल्ह्यात मेडीकल कॉलेजची अत्यंत आवश्यकता आहे .त्यानंतर शासनाला वाटेल तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल द्यावे मात्र मंजुर झालेले कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे म्हणजे जिल्हयातील लोकांची फसवणूक केली असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले.

Previous article“साक्री ची शान पांझरा कान” संकल्पनेचा होणार बहुमान,संघटीत व्हा,पांझराला परत साथ द्या….
Next articleअहेरी-वांगेपल्ली मधील ले आऊटधारकांकडून नियमाबाहयरित्या झालेल्या बांधकामाची चौकशी करा..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here