Home नांदेड इंधन बचत ही काळाची गरज – प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिने

इंधन बचत ही काळाची गरज – प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिने

72
0

राजेंद्र पाटील राऊत

इंधन बचत ही काळाची गरज –
प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिने

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड
आज जगात सर्वात मोठ्या समस्या इंधन विषयक निर्माण झाल्या आहेत.भारतात पेट्रोल, डिझेल याचे भाव गगनाला भिडले तर शेजारी श्रीलंका देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधन हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे या नैसर्गिक इंधनचा
वापर केल्याने संपते व त्याचा पुनर्वापर करता येत नाही म्हणून
इंधन बचत करणे ही काळाची गरज आहे,अन्यथा मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल. असा विचार प्राचार्य डॉ. एस. बी. अडकिने हे मुखेड आगार येथे इंधन बचत मासिक कार्यक्रम उदघाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यावस्थापक एस.टी.शिंदे हे होते तर उद्घाटक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.अडकिने हे होते,यावेळी प्रमुख पाहुने म्हणून डॉ.बी. टी.पाटील ,डॉ. एस. एच. टाले यांची उपस्थिती होती.

आगारप्रमुख एस.टी.शिंदे म्हणाले की इंधन बचत करणे हे काम चालकाच्या हातात आहे.
यांञिकांनी बसेसचे डिझेल लिकिज तात्काळ बंद करुन कंडिशन वाहने करावित
वाहनांना धक्का देऊन चालु करु नये असा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व
आभार धनंजय जाधव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here