Home पुणे वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगर...

वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगर परिसरात 100 पिंपळाचे वृक्षा रोपण

62
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220519-WA0056.jpg

वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगर परिसरात 100 पिंपळाचे वृक्षा रोपण

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्तपणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे ‘सण वृक्षांचा’ या अभियानाअंतर्गत पिंपळाच्या सहा फूट उंच वृक्षांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.
वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म याची अनुभूती देणारा दिवस आहे. त्याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मअनुभूतीचा साक्षात्कार झाला आणि तोच बोधी वृक्ष म्हणजे पिंपळ. या वृक्षाची लागवड करण्यात आली. भंते झेन मास्टर सुद्दसन यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जोपासेठ पवार, जगन्नाथ नाटक पाटील, उपसरपंच संतोष हगवणे, जगन्नाथ जरग, सुभाष पाटील, सचिन पवार, अर्जुन शिंदे, दीपक कसाळे, सतीश चव्हाण, शेवकर सर आदी उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत बोलताना अरुण पवार म्हणाले, की आम्ही संयुक्तपणे गेल्या पाच वर्षापासून देहू आणि परिसरात वृक्ष संवर्धनाचे काम केले जाते. गेल्या पाच वर्षात हजारो झाडांची लागवड आणि जोपासना या संस्थांमार्फत केली जात आहे. वृक्षलागवड आणि संवर्धन ही सामाजिक चळवळ व्हावी, यासाठी असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Previous articleपुणेत विवेकानंद महाविद्यालयाचा स्नेहमेळावा संपन्न
Next articleखत-बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा.शिवशकर पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here