Home नाशिक स्वतः चे पाप झाकण्यासाठी बेताल आरोप;सरपंचाला राहिले नाही महत्व!

स्वतः चे पाप झाकण्यासाठी बेताल आरोप;सरपंचाला राहिले नाही महत्व!

41
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220515-WA0032.jpg

स्वतः चे पाप झाकण्यासाठी बेताल आरोप;सरपंचाला राहिले नाही महत्व!
टाकळी येथील धक्कादायक प्रकार..
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव-नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या टाकळी गावात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून,तेथील आदीवासी समाजाचे सरपंच महेंद्र सोनवणे यांना कुठलेही महत्त्व राहिलेले नसून,त्यांच्या पदाला कवडीचेही महत्व उरले नसल्याने ग्रामपंचायतीकडून सर्रासपणे सावळा गोंधळ सुरु आहे.
युवा मराठाच्या ब्युरो टिमने आज टाकळी गावाला भेट दिल्यावर हा धक्कादायक प्रकार चव्हाटयावर आला आहे.ग्रामपंचायतीच्या मासिक मिटींगमध्ये केले जाणारे ठराव हे फक्त कागदोपत्री असून,प्रत्यक्षात कामे मात्र ठरावानुसार न करता वेगळ्या व भलत्याच ठिकाणी करुन बोगस बिले लाटण्याचा हा प्रकार आहे.त्याशिवाय कामे मजुराकडून करण्याऐवजी मशिनरी व्दारे करुन शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने लुटमार सुरु आहे.याबाबत सरपंच महेंद्र सोनवणे यांनी विरोध केल्यावर त्यांना हमरीतुमरी करुन एकेरी भाषेत त्यांना धुडकावून लावले जाते.तर या भागाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या विकासनिधीतून योग्य ते कामकाज सुरु असताना मात्र विरोधक एका स्थानिक यु-टुयुब वृतवाहिनीच्या पत्रकाराला हाताशी धरुन टाकळी गावाची व लोकप्रतिनिधीची बदनामी करीत असल्याचे एकंदरीत चित्र या गावात बघावयास मिळाले.म्हणजे विरोधक स्वतः चे पाप झाकण्यासाठी हे कुटील षडयंत्र करीत असल्याचा हा बनाव आहे असे म्हटले तर ते आतिशयोक्तीचे ठरु नये.

Previous articleनक्षल्यांनी केली युवकाची हत्या।
Next articleसहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची धाडसी कार्यवाही रात्रीची चोरटी वाहतूक करताना सगरोळी घाटातील 38 वाहने 5 जेसीबी ला पकडले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here