Home नांदेड सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची धाडसी कार्यवाही रात्रीची चोरटी वाहतूक करताना...

सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची धाडसी कार्यवाही रात्रीची चोरटी वाहतूक करताना सगरोळी घाटातील 38 वाहने 5 जेसीबी ला पकडले

99
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220516-WA0014.jpg

सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची धाडसी कार्यवाही

रात्रीची चोरटी वाहतूक करताना सगरोळी घाटातील 38 वाहने 5 जेसीबी ला पकडले
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील खाजगी रेती घाटावर रात्रीच्यावेळी रेतीची चोरटी वाहतूक करताना 38 वाहने पाच जेसीबीस पकडून बिलोलीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या टीमने मोठी कार्यवाही शनिवारी मध्यरात्री सगरोळी घाटांवर केली आहे.

लाल वाळू साठी प्रसिद्ध असलेल्या बिलोली तालुक्यातील काही खाजगी वाळू घाटे महसूल विभागाच्या परवानगीने सुरू करण्यात आली .मात्र या वाळू घाटांवर शासकीय नियमांचे राजरोसपणे उल्लंघन केले जाते.ही येथे नित्याची बाब होऊन बसली .येथे होणारे नियमांचे उल्लंघन अनेकदा पोलिसांच्या लक्षात आल्याने चांडक यांनी मागील सप्ताहात येसगी वाळु घाटात जेसीबी मशिन वर कार्यवाही करुन जप्त केली होती. ही घटना ताजी असतानांच पुन्हा चांडक यांनी शनिवारी राञी 2 वाजेच्या दरम्यान सगरोळी घाटात वाळुने भरलेल्या 38 वाहनांना राञीची नियमबाह्य वाहतुक करतांना पकडले. शिवाय याच घाटातल्या 5 जेसीबी मशिन ही ताब्यात घेतल्या. सदरील कार्यवाहीवरुन एक गोष्ट स्पष्ट केली की रात्रीच्या चोरट्या वाहतुकीवर त्यांची करडी नजर आहे. शनिवारी यासंबंधीची माहीती मिळताच मध्यराञी सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी बिलोली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे व रामतीर्थ पोलिसांच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री सगरोळी येथील घाटांवर धाड टाकली. ज्यात 38 वाळूने भरलेले वाहने रात्रीची चोरटी वाहतूक करतांना पकडली गेली .शिवाय या वाहनात वाळू भरणाऱ्या पाच जेसीबी ला सुद्धा या सहाय्यक पोलीस अधिक्षकांच्या या पथकाने पकडून कार्यवाही केली. महसुल विभागाकडुन या वाहनांवर मोठी दंडात्मक कार्यवाही होणार असल्याने महसुलचा गल्ला ही आता भरणार आहे. एकुणच चांडक यांच्या या कार्यवाहीने वाळु ठेकेदारांचे धाबे दणाणले असुन राञीची वाहतुक आता महागात पडु शकते असे संकेत या कार्यवाहीने चांडक यांनी दिले आहेत.

Previous articleस्वतः चे पाप झाकण्यासाठी बेताल आरोप;सरपंचाला राहिले नाही महत्व!
Next articleठिबकसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री अशोक चव्हाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here