शिंदखेडा तहसिलदार सुनील सैंदाणेचा
कारनामा;दोन बायका फजिती ऐका!
न्यायासाठी पहिल्या पत्नीचे उपोषण
(सागर कांदळकर/ दिपक जाधव युवा मराठा न्युज नेटवर्क)
धुळे/नंदुरबार-सतत या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरलेल्या शिंदखेडा जि. धुळे येथील तहसिलदार सुनील सैंदाणे यांची पहिली पत्नी आपल्या मुलासह न्यायासाठी आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी की,सिन्नर जि.नाशिक येथील रेशन घोटाळ्यातील संशयित आरोपी आणि सटाणा तहसिलला असताना वादग्रस्त म्हणून प्रसिध्द असलेल्या तहसिलदार सुनील सैंदाणे यांना आता आपल्या कृत्यांमुळे घरचाच आहेर मिळाला आहे.तहसिलदार सुनील सैंदाणे यांनी पहिली पत्नी हयात असताना अजमीर सौंदाणे ता. सटाणा येथील दुसऱ्या महिलेशी लग्न करुन पहिल्या पत्नीची फसवणूक केली आहे.सैंदाणे याने केलेल्या दुसऱ्या पत्नीलाही दोन अपत्य असल्याचे समजते.तर पहिल्या पत्नीवर व मुलांवर तहसिलदार सुनील सैंदाणेकडून सातत्याने अत्याचार होत असल्याने दिनांक १ मे २०२२ पासून शिंदखेडा तहसिल कार्यालयाबाहेर सैंदाणेच्या विरोधात प्रत्यक्षात त्यांची पहिली पत्नी व मुलांनी आमरण उपोषण न्यायासाठी छेडले होते,दरम्यान आज ३ मे मंगळवार रोजी लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याचे वृत हाती आले आहे.दरम्यान याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे सदर पिडीत पत्नीच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ जनहितार्थ न्याय याचिका संबधित तहसिलदार सुनील सैंदाणे विरोधात दाखल करणार आहे.
Home Breaking News शिंदखेडा तहसिलदार सुनील सैंदाणेचा कारनामा;दोन बायका फजिती ऐका! न्यायासाठी पहिल्या पत्नीचे...