Home गडचिरोली मैत्रिणी सोबत जंगलात जाणे बेतले जिवावर; वाघाच्या हल्यात तरुण ठार।

मैत्रिणी सोबत जंगलात जाणे बेतले जिवावर; वाघाच्या हल्यात तरुण ठार।

73
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220504-WA0020.jpg

मैत्रिणी सोबत जंगलात जाणे बेतले जिवावर; वाघाच्या हल्यात तरुण ठार।
गडचिरोली: ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- मैत्रीणसह जंगलात गेलेल्या तरुणाला वाघाने हल्ला करुन ठार केले.हि घटना (दि.03) काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर-उसेगाव रस्त्यावरील जंगलात घडली अजय मोरेश्वर नाकाडे (वय २४ रा.चोप.कोरेगाव)असे मृतक तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की,अजय नाकाडे काल चारचाकी वाहनाने एक मित्र आणी मैत्रीणसह उसेगाव येथील जंगलात गेले होते.अजय चा मित्र वाहनात बसुन होता,तर अजय आणि त्याची मैत्रीण जंगलात गेले होते.एवढयात दबा धरुन बसलेल्या वाघाने अजयवर हल्ला केला.झाडाची फांदी पडली असेल म्हणुन मैत्रीणने मागे वळून बघितले असता तिला वाघ दिसला.वाघाने अजयच्या नरडीला घोट घेऊन त्याला फरफटत दुरवर नेले.या झटापटीत त्यांच्या मैत्रीणलाही ओरबाडले.मैत्रीण धावत वाहनाजवळ आली.त्यानंतर अजयचा मित्र आणि मैत्रीणने उसेगाव येथील नागरिकांना ही घटना सांगितली.
“फलकाजवळ उभे केले वाहन”
शिवराजपुर-उसेगाव रस्त्यावर घंनदाट जंगल आहे.या जंगलात नरभक्ष वाघाचा वावर आहे.काही महिन्यापुर्वी वाघाने एका व्यक्तीला ठार केले होते.त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणुन वनविभागाने या परिसरात नरभक्षक वाघापासुन सावधान असा फलक लावला आहे.पंरतु अजय आणी त्याच्या मिञाने नेमके त्याच ठिकाणीं वाहन उभे केले आणि त्यांच जंगलात गेले.परिणाम अजयला जिव गमवावा लागला.

Previous articleशिंदखेडा तहसिलदार सुनील सैंदाणेचा कारनामा;दोन बायका फजिती ऐका! न्यायासाठी पहिल्या पत्नीचे उपोषण
Next articleयवत पोलिसांची धडाडीची कामगिरी गांजा तस्करांवर कारवाई
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here