Home उतर महाराष्ट्र १में रोजी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या (महा.राज्य ) वतीने महाराष्ट्र व...

१में रोजी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या (महा.राज्य ) वतीने महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त वासखेडी नगरीत मान्यवरांचा व कामगरांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

87
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220501-WA0074.jpg

१में रोजी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या (महा.राज्य ) वतीने महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त वासखेडी नगरीत मान्यवरांचा व कामगरांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

दिपक जाधव.
वासखेडी – येथील मं.गां.वि.विद्यालयात रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना (महा. राज्य) संस्थापक अध्यक्ष मा,दादासाहेब गायकवाड यांच्या प्रेरणेने १में च्या महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत मान्यवरांचा व कामगारांचा भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते,
अध्यक्षस्थानी श्री,शंकरजी,एज्यु,सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी शासकिय अधिकारी दादासाहेब विठ्ठलराव ठाकरे, तर प्रमुख पाहुणे म्हणुन निजामपूर पोलिस स्टेशनचे,पो,निरीक्षक श्रीयुत,श्रीकांत पाटील व शंकरजी,एज्यु,सोसायटी चे संस्थापक उपाध्यक्ष ,बापुसो, बी,पी,पाटीलसर होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस शाळेतील विध्यार्थीनी नी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले,आणि पुढील‌ मुख्य कार्यरक्रमास प्रारंभ करण्यात आला,प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब ठाकरे, यांचा सत्कार गावातील नागरीक तथा उपसरपंच दाजीसाहेब,संभाजी धनजी कुवर,यांच्या हस्ते करून मग प्रमुख पाहुण्यांचा सत्कार श्री,मधुकर जाधव. यांच्या हस्ते झाला मग,
पुढील सत्कारमुर्ती डॉ, महेशराव विठ्ठलराव ठाकरे, सौ,संगिताताई पाटील, मुख्या,जि.प.शाळा,सौ,के,एस,गायकवाड, मॅडम, वृक्षप्रेमी तथा जि.प.मुख्या,भालचंद्रजी कुवर,माजी उपसरपंच,सुरेशदादा सुर्यवंशी,मुख्या,व्ही,वाय सोनवणे,मनिषदादा दहीते,सौ,मनिषामाई बच्छाव (अंगणवाडी सेविका) सौ,रूपालीताई वाघ (अंगणवाडी सेविका) सौ,लताबाई दहीते (मदतनीस) या सत्कार मुर्तींचा वाल,श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.तसेच या प्रसंगी संचालक मंडळाचे देखील सत्कार करण्यात आले, यावेळी संचालक मंडळाचे श्री,रावसाहेब कुवर,मा.कौतिकराव कुवर,संभाजी लक्ष्मण कुवर, गोकुळजी कुवर,दिपक कुवर,नरेंद्र जी कुवर आणि माझी पोलीस पाटील दिलीप कुवर व गावातील ज्येष्ठ नागरीक दिगंबर लोटन कुवर इ.मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतावर विध्यार्थ्यांना संबोधिले की,आजचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील कामगारांचा सोहळा होय,१में ला लहान चिमुकल्यांचा सुध्दा सोहळा केला जातो,परंतु आपण भावी पिढीचे होतकरू विध्यार्थ्यी आहात,आज आपणांस सांगतो कि,जरी मी आज पोलीस निरीक्षक आहे,पण आदी शिक्षक होतो,आणि शेतकरी पण..मित्रांनो परस्थिती विसरू नका , परस्थिती समोर ठेवा, अभ्यास करा आणि मोठे होवुन शाळा तसेच समाजाचे ,आई वडीलांचे नाव कमवा,मी माझ्या गावातला पहिला शेतकऱ्यांचा पहिला फौजदार आहे,आणि मला माझ्या वडीलांवर गर्व आहे कि ते जगाचे एक पोशिंदे आणि मी माझ्या मातीतला आपला पोलीस रक्षक आहे,आजच्या दिवशी आपल्या सर्वाना शुभेच्छा देतो आणि थांबतो,जयहिंद..
पुढील अभिभाषणात सौ,संगिताताई पाटील म्हणाल्या की, कार्यक्रमाचे आयोजक,कुशल व्यक्तिमत्व दिपकभाऊ जाधव,यांना संघटनेने जिल्हाध्यक्ष पदी विराजमान केल्यामुळें आजच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देते,की त्यांना अशाच समाज कार्यात सदैव यश मिळत राहो,व गोरगरिबांच्या आशिर्वादाने जीवन घडत राहो,आणि आमचा आजच्या दिनी कामगार संघटनेचे वतीने जाहीर सत्कार करण्यात आला त्यासाठी मी त्यांचे आभार मानत इथेच थांबते,
शाळेतील विज्ञान शिक्षिका ,म्हणतात की, मी गर्वाने सांगते कि या मंदीरात संधीचे सोने करून घ्या,कारण वेळ खुप कठिण आहे,सांस्कृतिक कार्यक्रमात विध्यार्थ्यांना चांगली भुमिका कधीच लवकर येत नाही,मात्र दारूड्याची भुमिका लगेचज येते,याला कारण आपण आहोत,समाज आहे,वडील मुलांना सांगता कि,दारू आणि तबांखु घेऊन ये बेटा,
पण,वडील अभ्यास कर बेटा हेच का सांगत नाही,म्हणुन आपली सगळी संस्कृती आता लयास जातेय,तर विध्यार्थ्यांनो आपण घडलात तर जग बदलेल,आलेली संधी सोडू नका संधीचे सोन करून घ्या,हीच आपणांला शूभेच्छा देते ,आणि माझे दोन शब्द संपविते,
अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा ससमारोप करण्यांत आला. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्या,व्ही,वाय,सोनवणे,तर सुत्रसंचलन श्री, ठाकरे ,सरांनी केले, अनमोल सहकार्य शाळेतील शिक्षक ,एन,डी,पाटील,अमित देवरे, सौ,गायकवाड मॅडम, देसले सर, पेंढारे सर,चौरे सर,लिपिक बागुल सर,बापुसाहेब वाघ,आणि संदीपदादा कुवर यांनी केले,
कार्यक्रम यशस्विते करीता ,मधुकर जाधव,संभाजीराव कुवर,प्रकाश आबा जाधव,आत्माराम सुर्यवंशी, बाळाजी सुर्यवंशी ,महेंद्र मच्छिंद्र कुवर,रविंद्र साळुंखे,विनोद सुर्यवंशी, वेडु आबा जाधव,जगदीश सावळे,जितेंद्र रामदास दहीते,सूरेश बाबुलाल,मोहन जाधव,भाऊसाहेब जाधव,सौ भारती मधुकर जाधव,सौ,आशाबाई रविन्द्र साळुंखे, भारती सुर्यवंशी, तसेच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजक तथा रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ जाधव.यांनी आलेल्या मान्यवरांचा जाहीर आभार मानत, मी आपला सदैव ऋणी राहीन असा आजच्या महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त आपणांला शुभेच्छा देतो,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here