Home अकोला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम; झेंडा विक्री केंद्राचे शुभारंभ:नागरिकांनी उत्स्फूर्तपणे...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम; झेंडा विक्री केंद्राचे शुभारंभ:नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0025.jpg

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम;
झेंडा विक्री केंद्राचे शुभारंभ:नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘हर घर तिरंगा’, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘झेंडा विक्री केंद्रा’चे शुभारंभ जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते आज झाले. प्रत्येक घरावर तिरंगा लावून सर्व नागरिकांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद ग्रामीण जीवननोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत झेंडा विक्री केंद्राचे शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपजिल्हाधिकारी(रोहयो) बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी(पुनवर्सन) सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शैक्षणीक गुणवंत विकास केंद्राचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, उमेद अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नरेंद्र काकड, तालुका अभियान व्यवस्थापक अनिल शेरेवार, कौशल्य विकास समन्वयक अमोल विरोंकार, सुधीर फलके, भारतभूषण टोपरे आदि उपस्थित होते.

केंद्र शासनामार्फत हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत 60 हजार झेंडे विक्रीकरीता प्राप्त झाले आहे. उमेद प्रकल्पा अंतर्गत असलेल्या बचत गटामार्फत जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर झेंडे विक्री करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज जिल्ह्यात तीन ठिकाणी झेंड विक्री केंद्राचा शुभारंभ झाला आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जिल्हा परिषद परिसर व वनविभाग येथील वनधन विक्री केंद्र येथे झेंडे विक्री केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वखर्चाने घरांवर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here