Home गडचिरोली सावली तालुक्यातील असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या रोवणीकरिता लवकरात लवकर सोडा असे निर्देश...

सावली तालुक्यातील असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या रोवणीकरिता लवकरात लवकर सोडा असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी दिले

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220802-WA0021.jpg

सावली तालुक्यातील असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या रोवणीकरिता लवकरात लवकर सोडा असे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी दिले                  गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सावली तालुक्यातील असोलामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या रोवणीकरिता,बाशी करीता, लवकर सोडावे. कारण तालुक्यामध्ये शेतकरीवर्ग रोवण्याच्या कामात जोराने सुरुवात केलेले आहे परंतु चार,पाच दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतीच्या बांधावर रोवण्याकरिता पाणी नाही. खासदार साहेब हे दिल्ली येथे अधिवेशनात असल्याने हि बाब दिवाकर गेडाम यांनी या क्षेत्राचे लोकप्रिय खा.श्री.अशोकजी नेते यांना लक्षात आणून दिल्यानंतर असोलामेंढा प्रकल्पाचे मुख्यअभियंता सोनुणे साहेब यांना फोन करून सांगितले की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी पाणी सोडा असे सांगितल्यानंतर सोनोने साहेबांनी कापशी मायनरवरील काही काम चालु असल्याने लवकरच दुरुस्त करून या दोन-तीन दिवसात पाणी सोडले जाईल असे सांगितले.
त्यावेळी सोनोने साहेब यांनी एक सूचना दिली तालुक्याच्या विभागामध्ये पाणी वापर संस्थेने मागणी अर्ज करावे लागते त्यानुसार शेतकऱ्याच्या मागणीनुसार आम्हाला लवकर पाणी सोडता येईल असे सुद्धा बोलले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here